Marathwada

जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी बनले वृक्षदिंडीचे वारकरी

24 जुलै रोजी वृक्ष लागवड होणाऱ्या 14 गावातही निघाली प्रभात फेरी

लातूर (जिल्हा प्रतिनिधी) – लातूर जिल्हा अजूनही रेल्वेनी पाणी आणल्याचे विसरत नाही. तो भूतकाळ विसरून लातूर जिल्हा पाणीदार करायचा आहे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात मातीची धूप थांबविणाऱ्या, पाणी धरून ठेवणाऱ्या,  पर्यावरण आणि जैवविविधता जोपासणाऱ्या वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात करून लातूर हाही एक पॅटर्न तयार करु या असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांनी केले.  मांजरा नदीच्या दुतर्फा 24 जुलै रोजी होणाऱ्या वृक्ष लागवड मोहिमेच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरात उत्साहात वृक्ष लागवडीचा जागर करत जन जागृतीची प्रभात फेरी काढली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी या प्रभात फेरीत वृक्ष दिंडीही ग्रीन लातूर टीमने काढली होती. त्या दिंडीतील तुळशीचे वृंदावन घेऊन जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वारकरी झाले होते. 

24 जुलै रोजी लातूर तालुक्यातील भटखेडा, सोनवती, धनेगाव, शिवणी खुर्द, भातांगळी, भाडगाव, रमजानपूर, उमरगा, बोकनगाव, सलगरा ( बु. ), बिंदगीहाळ तर औसा तालुक्यातील शिवणी बु, तोंडवळी, होळी या चौदा गावात वृक्ष लागवड होणार आहे अशा चौदा गावातही सकाळी मोठ्या उत्साहात जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत राजर्षी शाहू महाविद्यालय,  दयानंद कला, वाणिज्य, विज्ञान आणि विधी महाविद्यालय, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, त्रिपुरा महाविद्यालय, श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय, चन्ना बसवेश्वर महाविद्यालय, कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव, जायक्रांती महाविद्यालय लातूर, केशवराज विद्यालय, देशीकेंद्र विद्यालय, कमला नेहरू विद्यालय,बोरी, शिवाजी महाविद्यालय, शिवणी बु.,राजर्षी शाहू विद्यालय,बोरी, 14 ग्रामपंचायत आणि तेथील जिल्हा परिषद शाळा यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. लातूर शहरातून निघालेली प्रभात फेरी जिल्हा क्रीडा संकूलातून निघून शिवाजी चौक मार्गे घोषणा देत,  मोठे फलक ज्याच्यावर वृक्षाचे महत्व विशद करणाऱ्या ओळी अशा उत्साहात निघालेल्या प्रभात फेरीची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क ( टाऊन हॉल ) येथे करण्यात आली.  या प्रभात फेरी मध्ये ग्रीन लातूर वृक्ष टीम, आर्ट ऑफ लिव्हिंग, आधार फाऊंडेशन,लातूर वृक्ष चळवळ, आम्ही मावळे शिवबाचे, रोटरी मिडटाऊन, लातूर सायकलिस्ट क्लब, वसुंधरा प्रतिष्ठान या विविध संस्थाही या प्रभात फेरीत सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!