SOLAPUR

उपोषणाचा इशारा देताच आयुक्तांनी घेतली सोलापूर विकास मंचसोबत ताततडीची बैठक

– सोलापूर विकास मंचसमवेत महापालिका अधिकार्‍यांच्या शहरातील प्रमुख विषयांच्या बैठकीस सकारात्मक प्रतिसाद

सोलापूर (हेमंत चौधरी) – सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषयांवर लोकप्रतिनिधी आणि सोलापूरच्या प्रशासनाच्या उदासीन कारभाराविषयी सोलापूरकरांमध्ये प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत असून, सदर प्रकाराच्या निषेधार्थ सोलापूर विकास मंचच्यावतीने बुधवार (दि.२५) सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत एक दिवसीय तीव्र लाक्षणिक उपोषण करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. सोलापूर विकास मंचच्या ह्या उपोषणाच्या आवाहनाची सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी तातडीने दखल घेऊन आज (दि.२५) सायंकाळी ४:३० वाजता त्यांच्या दालनात सोलापूर विकास मंचच्या सदस्यांसमवेत सोलापूरकरांना भेडसावणार्‍या समस्यांच्या निराकरणासाठी बैठक आयोजित केली. सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने एक दिवसीय तीव्र लाक्षणिक उपोषणाआधी सकारात्मक दखल घेतली म्हणून त्यांचे सन्मान राखत सोलापूर विकास मंचच्या उपोषण संस्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सोलापूरात शुध्द, नियोजनबद्ध आणि नियमित पाणी पुरवठा करणे, छत्रपती संभाजी महाराज चौक ते सीएनएस हॉस्पिटल ते विजापूर रोड ५४ मिटर तातडीने पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून घेत सदर रस्ता तातडीने पूर्ण करणे, सोलापूर शहराची परिवहन व्यवस्था सुरळीत करणे, महिला आणि पुरुष प्रसाधनगृहांची व्यवस्था, स्मार्ट सिटीच्या सर्व कामांचे फॉरेन्सिक ऑडिट करणे, जुळे सोलापूर सुधारणा आराखडा तातडीने तयार करुन त्यावर काम सुरू करणे, सर्वाधिक कर भरणार्‍या जुळे सोलापूरकरांना विविध भौतिक नागरी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, धुळ, वृक्षारोपण, भटक्या कुत्र्यांचे निरर्जिबीकरण, भटक्या गाय वासरांचे योग्य संगोपन, अनाधिकृत बेकायदेशीर बॅनर च्या सुळसुळाटा पासुन सुटका करत त्यांच्या वर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे, सोलापूर शहराच्या सौदर्याला बाधा आणणारे अनाधिकृत बेकायदेशीर बांधकाम, टपर्‍या, स्टॉल, अतिक्रमणे तातडीने हटवणे इत्यादी विषयांवर सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी करुन त्यावर सुयोग्य उपाययोजना देखील सादर केले.
सोलापूर विकास मंचच्या सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषय अभ्यासपूर्णपणे मांडुन त्यावर उपाययोजना सुचल्या बद्दल सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे यांनी समाधान व्यक्त केले आणि तातडीने संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांशी सर्व समस्यांचे निराकरण करुन १५ दिवसात त्याचे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. ह्या बैठकीस मिलिंद भोसले, केतन शहा, योगिन गुर्जर, अनंत कुलकर्णी, गणेश पेनगोंडा, गणेश शिलेदार, आनंद पाटील, इक्बाल हुंडेकरी, अ‍ॅड. दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षिरसागर, आरती अरगडे, नरेंद्र भोसले, चंद्रकांत इश्वरकट्टी, विजय कुंदन जाधव, सोलापूर विकास मंच, वेक अप सोलापूर फौंडेशन, गिरिकर्णिका फाऊंडेशनचे आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!