आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील खंडोबाचे माळरानावर माऊलींचे पालखीसह श्री रामाची पालखी, श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज पालखी, श्री भैरवनाथ महाराज ग्रामदैवत पालखीचे हरीनाम गजरात विजया दशमी दिनी सीमोल्लंघन उत्साहात झाले. श्रींचे सीमोल्लंघन प्रसंगी भाविक, नागरिकांनी पालखीतील श्रींचे दर्शनासह श्री खंडोबा देवदर्शनास गर्दी केली. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचेवतीने यावर्षी लक्षवेधी विद्युत रोषणाई तसेच मंडप व्यवस्था करण्यात आली होती.
परंपरेने ग्रामदैवत श्री खंडोबा मंदिर माळरानावर या प्रसंगी आळंदी देवस्थानचे विश्वस्त विकास ढगे पाटील व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, आळंदी खंडोबा मंदिरात आळंदी ग्रामस्थ, नगारखाना प्रमुख सचिन रानवडे, बाळासाहेब भोसले, नरहरी महाराज चौधरी, श्रींचे सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे, बाळासाहेब रणदिवे, स्वामींचे पुजारी मुकुंद काका गांधी, माऊलींचे मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे, संतोष मोझे, योगेश आरु, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, प्रकाशशेठ कुऱ्हाडे पाटील, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांचे सह आळंदीतील विविध मंदिर देवस्थानचे प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ, भाविक तसेच वारकरी उपस्थित होते. श्री खंडोबा मंदिर माळरानावर परंपरेने शहरातून नागरिक, भाविक यांनी श्रीचे पालखीचे दर्शनास गर्दी केली. टाळ, मृदंग, वीणेच्या त्रिनादात दिड्यातील भाविक श्रींचे पालखीसह नामजयघोष करीत श्री खंडोबाचे दर्शनासह श्रींचे पालखी दर्शन आणि सीमोल्लंघनास उपस्थित होते. विजया दशमी निमित्त माऊली मंदिरात पहाटे घंटानाद, काकडा आरती, पवमान अभिषेक पूजा, भाविकांच्या महीम्न पुजा, अभिषेक प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचे हस्ते झाली. भाविकांचे श्रीचे संजीवन समाधी दर्शन, श्रीना महानैवेध्य, माउलीचे बागेत शमी पूजन, विना मंडपात प्रवचन सेवा उत्साहात झाल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
श्रीचे पालखीचे शाही लवाजम्यासह सीमोल्लंघनास हरिनाम गजरात विविध मंदिरातून प्रस्थान झाले. आळंदी देवस्थानतर्फे श्रींची पालखी मंदिरात परत आल्यानंतर धुपारती त्यानंतर श्रीची नित्य नैमितिक पूजा आरती ,विजया दशमी निमित्त आळंदीतील श्री रामाची, श्री स्वामी महाराज यांचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा आणि मंदिरात आगमना निमित्त स्वागत उत्साहात झाले. यावेळी संस्थांन चे वतीने मानकऱ्यांना नारळ प्रसाद देण्यात आला. विजयादशमी दसरा आणि नवरात्रीतील प्रथा परंपरांचे पालन करीत आळंदीत संस्कृती जोपासण्यास प्राधान्य देण्यात आले. सोन्याचे प्रतिक असलेली आपट्याची पाने भाविक, नागरिकांनी एकमेकांना देत चांगले विचार जोपासण्याचा संदेश दिला. आळंदीतील मंदिरात भाविकांनी दर्शनास तसेच प्रागंणात नव्या गाड्यांचे पूजनास गर्दी केली. श्रींचे सीमोल्लंघन प्रसंगी श्रींचे पालख्यान समोर भजन ,अभंग, आरतीत भाविक तल्लीन झाले. नागरिकांनी यावेळी उत्स्फूर्त दाद दिली. श्रींचे पालखी मार्गावर दुतर्फा नागरिकांनी श्रींचे दर्शन घेतले. येथील भाईचारा फाउंडेशन कार्याध्यक्ष सुलतान शेख यांनी पालख्याचे स्वागत केले. यावेळी क्रांती पार्क मधील नागरिक उपस्थित होते.
आळंदीत विविध ठिकाणी विजया दशमी दसरा निमित्त नवोपक्रमांची सुरुवात झाली. विविध व्यापारी आस्थापनांमध्ये गृहोपयोगी वस्तूंचे खरेदीस ग्राहकांनी मोठी गर्दी केली. आळंदी तीर्थक्षेत्रात परंपरेचे पालन करीत विजया दशमी साजरी करण्यात आली. सीमोल्लंघन प्रसंगी भाविकांनी सोन्याचे प्रतीक असलेली आपट्याची पाने भेट देत एकमेकांना आलिंगन देत गळा भेट घेत उत्साहात शुभेच्छा दिल्या. आळंदी येथील पद्मावती देवी मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत नवरात्रोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी आळंदी देवस्थान आणि रानवडे परिवार यांनी भाविकांचे स्वागत करीत सेवासुविधा देत कमी वेळेत भाविक, महिला, पुरुषांना देवदर्शनची व्यवस्था करण्यास दहा दिवस परिश्रम घेतले. आळंदी पोलीस स्टेशनचे वाटणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, पोलीस निरीक्षक रमेश पवार, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांनी पालखी प्रदक्षिणा दरम्यान पोलीस बंदोबस्त प्रभावी ठेवत सुरळीत, सुरक्षित रहदारी ठेवण्यास परिश्रम घेतले. माऊली मनादिरात लक्षवेधी फुलांची सजावट करण्यात आली होती. नवरात्री निमित्त विविध मंडळांनी विविध स्पर्धा आणि दांडीयांचे कार्यक्रम उत्साहात केले. यास मोठा प्रतिसाद मिळाला. येथील श्री तुळजा भवानी मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर येथे परंपरेने धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. श्री महालक्ष्मी मंदिर येथे समाजरत्न नानजीभाई ठक्कर यांचे हस्ते पूजा आरती झाली. संयोजक मनोहर दिवाने परिवार तर्फे स्वागत व सत्कार करण्यात आला.