सिंदखेडराजा/देऊळगावराजा (अनिल दराडे) – सहकारमहर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सिंदखेडराजा ते बुलडाणा पुण्यस्मरण यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी पुण्यस्मरण रथ सिंदखेडराजा येथून देऊळगावराजा येथे ९.३० वाजता बस स्टँड चौकात पोहोचला, तेव्हा तिथे सर्व जाती-धर्मातील लोकांनी स्व. शिंगणे साहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती.
सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांनी आपल्या जीवनात अनेक पदे भूषविली व त्या पदाना न्यायही दिला. त्यांनी सभापती पंचायत समिती देऊळगाव राजा, उपाध्यक्ष जिल्हा परिषद बुलढाणा, अध्यक्ष जिल्हा केंद्रीय सहकारी बँक बुलढाणा, विधानसभा आमदार सिंदखेडराजा, अध्यक्ष मार्केटिंग फेडरेशन, अध्यक्ष कृषी औद्योगिक महामंडळ, अध्यक्ष, पणन महासंघ, अध्यक्ष ,पैनगंगा सूतगिरणी, साखरखेर्डा, विविध पदावर काम करत असताना समाजातील, तरुण, शेतकरी, कष्टकरी लोकांना एकत्र घेऊन त्यांच्यासाठी विकासाचे काम सहकाराच्या माध्यमातून त्यांनी केले. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सहकाराच्या फार मोठ जाळे निर्माण करून सर्व समाजातील घटकांना योग्य न्याय देण्याचं काम साहेबांनी केले. तरुणांच्या हाताला काम आणि शेतकर्यानं साथ देत, साहेब, समाजकारण, राजकारण, योग्य दृष्टिकोन आणि योग्य दृष्टिकोन आणि काम करण्याची शैलीयामुळे लवकरच सर्वसामान्याच्या मनात घर केले आणि अल्पावधीत सहकार महर्षी झाले. त्यामुळे साहेबांवर प्रेम करणारा खूप मोठा चाहता वर्ग बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. देऊळगावराजात बस स्टँड चौकात, संतोष खांडेभराड, डॉ. रामप्रसाद शेळके , सदाशिव मुंडे ,राजू शिरसाट ,शेरे ,गंगाधरजी जाधव, अशा अनेक मान्यवरांनी स्व. भास्करराव शिंगणे साहेबांना अभिवादन केले.
————