ChikhaliVidharbha

काँग्रेसच्या मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदी राम डहाके

उदयनगर, ता. चिखली (प्रतिनिधी) – आगामी काळात निवडणुकांच्या अनुषंगाने अखिल भारतीय काँग्रेस कमिटी नवी दिल्लीकडून महाराष्ट्रातील २७ विधानसभा मतदारसंघासाठी समन्वयकांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली, त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष रामभाऊ डहाके यांची नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जाहीर केली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी,तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने संघटनात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करून निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जोरदार कंबर कसत समन्वयकांच्या नियुक्ती जाहीर केल्या. जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघासाठी अभ्यासू पण तेवढाच आक्रमक, निर्भीड चेहरा म्हणुन ओळखल्या जाणारे काँग्रेसचे ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष रामभाऊ डहाके यांची नियुक्ती करीत त्यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. त्यांचे आजवर पक्ष संघटनेसाठी असलेले योगदान व कार्यकर्तृत्वाची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने त्यांची नियुक्ती जाहीर केली.
रामभाऊ डहाके यांनी आपली नियुक्ती होताच पहिल्याच दिवशी मेहकर व लोणार येथे दौरा करून तालुका व शहर काँग्रेस कमिटी कडून संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला,तर मतदारसंघांमधील गावागावातील बुथवर पक्ष संघटन मजबूत करीत सर्वसमावेशक संघटन उभारणीसह येणार्‍या काळामध्ये सर्वच्या सर्व निवडणूका एक हाती जिंकण्यासाठी सर्वांना सोबत घेत काही महत्वपूर्ण सूचना देखील केल्या, निर्भीड स्वभावाचे रामभाऊ यांनी या अगोदर गुजरात व कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीत विविध मतदारसंघामध्ये समन्वयकाची जबाबदारी यशस्वी पणे पार पाडलेली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार सर्वांना सोबत घेत बुथ लेवलपासून तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिस्तबद्धपणे संघटन मजबूत करीत पुढे जाऊ, अशा भावना रामभाऊ यांनी बोलताना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!