LONARVidharbha

वसंतराव नाईक विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

- लोणार येथील शालेय अंडर नाईन्टीन तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मिळवले घवघवीत यश

बिबी (ऋषी दंदाले) – लोणार येथे शालेय अंडर नाईन्टीन तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये झालेल्या शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये बिबी येथील वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयातील क्रिकेट संघाने भरघोस विजय मिळवून जिल्हास्तरावर निवड झाल्याचा बहुमान मिळविला आहे.

लोणार येथे दि. १८ सप्टेंबररोजी घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय अंडर नाईन्टीन क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट या खेळामध्ये बिबी येथील वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अजिंक्य आटोळे, गणेश खंडागळे, रोहन आंधळे, तुषार मुर्तडकर, कृष्णा महाजन, आदित्य सरकटे, रवी भोकरे, सुमित मोरे, विवेक खार्डे, ओम राठोड, शुभम राठोड, संकेत बनकर, धीरज चव्हाण, धीरज फड, अमित तांदुळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी बजावून घवघवीत यश मिळविले व जिल्हास्तरीय स्पर्धा खेळण्यासाठी निवड झाल्याबद्दल वसंतराव नाईक महाविद्यालयाचे अध्यक्ष अभय चव्हाण, प्राचार्य आर बी राठोड, क्रीडा शिक्षक एस आर राठोड, व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी या स्पर्धेचे नेतृत्व अरुण खरात, मस्के सर ,मिसाळ सर, यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!