-८५ ते ९० किलो वजन गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक; विभागीय स्पर्धेसाठी निवड
चिखली (राजेंद्र घुबे) : जिल्हा क्रीडा कार्यालय, बुलढाणा व पुणे क्रीडा संचालनालय यांच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या वुशू स्पर्धेत जानकी देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी खेळाडू शेख अमीन शेख शाकीर याने ८५ ते ९० किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
शेख अमीन शेख शाकीर याने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली असून, त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेनफडराव घुबे, सचिव प्रा. उद्धवराव घुबे, प्राचार्य बबनराव लांडगे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी खेळाडूचे अभिनंदन केले. तसेच आगामी विभागीय स्पर्धेसाठी शेख अमीन शेख शाकीर याला शुभेच्छा दिल्या.