तीर्थक्षेत्र भीमाशंकर विकासास १४८ कोटींचा विकास आराखडा : मुख्यमंत्री शिंदे
भीमाशंकर-आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : तीर्थक्षेत्र भीमाशंकरला राज्यासह परिसरातून भावीक मोठ्या श्रद्धेने, भक्तीभावाने श्रींचे दर्शनास येतात. मी स्व. आनंद दिघे यांचे पासून आता पर्यंत दर वर्षी श्रावणी सोमवारी निमित्त भीमाशंकर ला श्रींचे दर्शनास येत आहे. येथे हजारो, लाखो भाविक भक्त ही दर्शनास येतात. येथीलतीर्थक्षेत्र विकासास १४८ कोटीं रुपयांचा विकास आराखडा शासनाने विकसित केला आहे. या अंतर्गत सुमारे ६८ कोटी रुपयांची विविध विकास कामे झाली असून भाविकांना सेवा सुविधा देण्यास विकास निधी खर्च झाला आहे. येथे येथे आल्यावर भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. येणाऱ्या भाविकांना नागरी सेवा सुविधा देण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. यात पिण्याचे पाणी, स्वच्छता, स्नान ग्रहांचे संकुल, भीमाशंकर परिसरातील वाड्या वस्त्या,तसेच आदिवासी पाड्यात देखील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यास सूचनादेश दिल्या असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान मध्ये श्री ज्योतिर्लिंगाचे दर्शन, विधिवत पूजा, आरती केली. पूजे नंतर ते म्हणाले, राज्यातील बळीराजावरचे संकट दूर व्हावे, राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडू दे आणि येथेही पाऊस पडत आहे. राज्यावरचे दुष्काळाचे सावट असलेले संकट दूर करून राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे असे सांगत ते म्हणाले, राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे अशी प्रार्थना श्रींचे कडे व्यक्त करीत भीमाशंकरास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साकडे घातले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट तर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नर आंबेगाव उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, खेड उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसिलदार तथा देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त संजय नागटिळक, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवांदे, दत्तात्रय कौदरे, रत्नाकर कोडीलकर माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, अशोक भुजबळ, आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण, उमेश बिडकर, सचिन शिंदे, नितीन ननवरे, कामगारनेते इरफान सय्यद, अर्जुन मेदनकर, महादेव पाखरे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे यांचे समयसूचकतेचे कौतुक
यावेळी भाविकांची दर्शन बारी पूजे दरम्यान बंद केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निदर्शनात येताच त्यांनी संबंधित देवस्थान प्रशासनास लगेच दर्शन बारी सुरु ठेवण्याचे सूचना दिल्या. या नंतर तात्काळ भाविकांचे दर्शनही पूजे दरम्यान सुरु करण्यात आले. यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले. एकाच वेळी पूजा आणि भाविकांची दर्शन व्यवस्था सुरु राहिल्याने परिसरातून मुख्यमंत्री शिंदे यांचे समयसूचकतेचे कौतुक केले.