Uncategorized

आम्हाला ‘फुलनदेवी’ होण्यास भाग पाडू नका; देशात पुन्हा मनुस्मृतीची अंमलबजावणी!

या स्वतंत्र लोकशाही भारतात जर या राज्यकर्त्याकडून महिलांचे संरक्षण होत नसेल तर आम्हा महिलांना फूलन देवीचं व्हावं लागेल. तेव्हाच हे राज्यकर्ते ठिकाणावर येतील. उभा देशभक्त, मणिपूर पेटलेला आहे. माता भगिनीची नग्न धिंड काढून त्यांच्या नको त्या अवयवाला हे राक्षस, राक्षसी वृत्तीचे पुरुष स्पर्श करून त्या महिलांवर बलात्कार करून त्यांना जिवे मारून टाकल्या जात आहे. तरी आमची ५६ इंच छाती तिचा कुठे आवाज दबला काय?


जयश्री बी सोनवणे पत्रकार /वृतनिवेदिका

अरे देशातल्या राजकारण्यांनो तुम्ही झाले असतील मंत्री, संत्री, आमदार खासदार पंतप्रधान. तुमची स्वप्न साकार तर उघडा डोळे आणि द्या या देशातील माता बहिणीच्या प्रश्नाकडे लक्ष! भाजपा शासित मणिपूर राज्यातील घटना बघितली अगदी अंगावर शहारेच! निशब्द! काय बोलावं काही सुचत नाही. या देशात नेमकं चालंय तरी काय? जो तो आपल्याच नादात गुंगं! कधी कधी असं वाटतंय की, हा भारत देश दिडशे वर्षे , इंग्रजांच्या पारतंत्र्यात होता तेचं बरं होतं, या लोकशाही भारतात कायदा सुव्यवस्थेचे या राज्यकर्त्यांनी पुर्णतः धिंडवडे उडवून जणू ही लोकशाही आपली रखेल केली. धिक्कार करते या गल्लीच्छ आणि निच शासन व्यवस्थेचा. या स्वतंत्र लोकशाही भारतात जर या राज्यकर्त्याकडून महिलांचे संरक्षण होत नसेल तर आम्हा महिलांना फूलन देवीचं व्हावं लागेल. तेव्हाच हे राज्यकर्ते ठिकाणावर येतील. उभा देशभक्त, मणिपूर पेटलेला आहे. माता भगिनीची नग्न धिंड काढून त्यांच्या नको त्या अवयवाला हे राक्षस, राक्षसी वृत्तीचे पुरुष स्पर्श करून त्या महिलांवर बलात्कार करून त्यांना जिवे मारून टाकल्या जात आहे. तरी आमची ५६ इंच छाती तिचा कुठे आवाज दबला काय असंच वाटायला लागलाय. माझ्या देशातल्या तमाम महिलांनो उठा रणरागिणींनो पेटवा अन्यायाच्या मशाली, पेटवा या गलिच्छ राज्यकर्त्यांना. मणिपूर ऐकून मी नि:स्तब्ध झाले. जर यांच्याकडून कायद्याची अंमलबजावणी होत नसेल तर देशाच्या पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. परंतु ही , गेंड्याच्या कातड्याची औलाद, असून आम्हा आया बहिणीवर होणारा न्याय ते थांबू शकत नाही हेही तेवढेच कटू सत्य आहे.
रोज सोशल मीडियाच्या माध्यमातून, मल्टी मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून या देशामध्ये, विशेषत: देशातील भाजपा शासित मणिपूर राज्यामध्ये आज जे बघायला मिळत आहे ते बघून अंगाचा थरकाप होत आहे. कसं बाहेर फिरावं! कसं जीवन जगावं आम्ही महिलांनी! बघावं ते नवलंच. कुठे गेले हे ५६ इंच छातीचे सत्ताधारी? महागाईचे वाढते दर बघता रोजच्या दोन वेळचा जेवणाचा प्रश्न सोडवावा कि, राजकारण्यांचं प्रदर्शन बघतं बसावं? रोज माझ्या माता भगिनींच्या इज्जत्तीचे धिंडवडे काढून सोशल मीडियावर प्रदर्शीत केले जातात. तर दुसरीकडे राजकारणी, नेते मंडळींच्या पार्ट्या चालतात. कोण ती सीमा हैदर! पाकिस्तानमधून गेम खेळत भारतात येते. आणि सर्वांचे लक्ष वेधून घेते. मी म्हणते तिची एवढी पब्लिसिटी कशासाठी ? मुळात ती एक महिला बॉर्डर पार करून भारतात येतेच कशी? नेमकं ती गेम खेळून प्रेमात पडली कि प्रेमात पाडून भारताचा गेम करायला ती आली ? अरे या देशातील वेगवेगळे ज्वलंत प्रश्न बाजूला ठेऊन फालतू लोकांवर तुम्ही वेळ खर्च करताय?.
मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची घटना बुधवारी उघड झाली. ही घटना ४ मे २०२३ रोजी घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ मात्र बुधवारी वार्‍यासारखा व्हायरल झाला. म्हणजे तीच तीच पुनरावृत्ती, माझ्या आयाबहिणी फक्त न्यायाच्या प्रतीक्षेत. आरे मी म्हणते या घटनेला दोन ते अडीच महिने झाले. आणि आपल्याला हे आज कळतंय. बरं ठीक आहे, काही तांत्रिक अडचणीमुळे हा व्हिडीओ आपल्यापर्यंत उशिरा पोहचला पण इथलं हरामखोर सरकार काय थोबाडाला कुलूप लावून डोळे बंद करून बसलंय. का ? कशासाठी ? आरे भडव्यांनो त्या मणिपूरच्या महिला किंवा कुकी महिला म्हणून त्यांच्याकडे पाहण्यापेक्षा त्यांच्यात आपल्या आयाबहिणींना जेव्हा तुम्ही पाहताल ना तेव्हा कुठेतरी माणुसकी तुमच्यात जागी होईल. तेव्हा नाही जेव्हा तुम्ही फक्त प्रत्येक वेळी घटना घडून गेल्यानंतर ‘जाहीर निषेध ‘, ‘भावपूर्ण श्रद्धांजली ‘ किंवा जाहीर पाठिंब्याचे स्टेटस टाकताल. याने काही होणार नाही. याने फक्त माझ्या आया बहिणी सदैव न्यायाच्या प्रतीक्षेतचं राहतील. आपल्या पुरुषप्रधान देशात स्त्रियांनी खूप नाव आणि यश मिळवलंय यात काही शंकाच नाही. पण अजून वास्तव हेच आहे की, आपल्या देशात आजही महिला सुरक्षित नाहीत. प्रत्येक स्त्रीला आपण सन्मानाने वागवलंच पाहिजे. तरच स्त्रिया सुरक्षितपणे आणि निर्भयपणे घराबाहेर पडू शकतील. स्त्रियांच्या संरक्षणासाठी प्रथम स्त्रियांनी सक्षम होण्याची गरज आहे. मुलींना, स्त्रियांना कराटे किंवा स्वसंरक्षणाचे शिक्षण देणं गरजेचं आहे. तसंच स्त्रियांवरील अत्याचाराविरूद्ध कडक कायदे निर्माण करणं गरजेचं आहे. शाळकरी मुलींवर बलात्कार, कधी तरुणींची छेड तर कधी महिलेचा विनयभंग या घटना वारंवार घडतात.
महिलांशी संबंधित गुन्ह्यांची संख्या ही गेल्या काही वर्षात सातत्याने वाढती आहे. बलात्कार, विनयभंग, अपहरण अशा सर्वच गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे. एकतर्फी प्रेमातून होणार्‍या हत्या – खरं तर प्रेम कोणी कोणावर करावं हा ज्याचा त्याचा अतिशय खासगी असा विषय आहे, परंतु भारतीय लोकशाही व्यवस्थेत विवाहाचा जोडीदार म्हणून पुरुषाने एखाद्या स्त्रीला निवडले तर तिला नकाराचा अधिकार नाही. त्यामुळे असा नकार दिलेल्या स्त्रीला जगण्याचा अधिकार नाकारणे हा भारतीय जीवनातल्या हिंसेचा एक वेगळा आकृतिबंध विकसित होत आहे. त्याला ‘एकतर्फी प्रेम’ म्हणतो.अशा एकतर्फी प्रेमाच्या अनेक घटना गेल्या वर्षभरात आपल्या देशात घडल्या. त्यामध्ये अनेक महिलांच्ाा बळी गेला.हल्ली मुलीने आपला जोडीदार निवडण्यासाठी हाताच्या बोटावर मोजावे एवढेच पालक आपल्या मुलींना साथ देतात. पण त्यांच्याकडे देखील बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळाच असतो. दिल्लीच्या मेहरोली भागात घडलेले ‘श्रद्धा वालकर’चे उदाहरण तर अगदी अलिकडचेच. कर्नाटकातील हिजाब संदर्भातील वादाने मुस्लिम महिलांच्या समस्यांच्या अनुषंगाने चर्चा होण्यापेक्षा धर्माचा मुद्दा महत्त्वाचा बनला. महिलांना माणूस म्हणून मान्यता मिळावी, यापेक्षा महिलांनी कोणते कपडे घालावे यावर चर्चा केंद्रित झाली. स्त्रियांच्या पेहरावाबाबत समाजाच्या विविध घटकांचा असलेला विरोधाभासी आणि रुढी-परंपरावादी दृष्टिकोन विविध प्रकरणांच्या निमित्ताने समोर आला. समाज ज्यांच्याकडे न्याय आणि समानतेच्या अपेक्षेने पाहतो, ते घटकही या मुद्द्यावर एकांगी विचार करीत असल्याचे अनेक प्रसंगांतून दिसून आले. ही स्थिती पाहता स्त्रियांना माणूस म्हणून मान्यता देण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल सुरू आहे, असे म्हणता येत नाही. मुलाने मुलीला पळवून नेले म्हणून मुलीच्या नातलगांनी मुलाच्या आजीला विवस्त्र करून मारहाण केली तसेच या मारहाणीचा व्हिडिओ तयार करून तो वायरल केला. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात आंतरजातीय विवाह केल्यानंतर मुलीला तिच्या सासरी भेटायला गेलेल्या भावानं बहिणीची हत्या करून तिचं शीर धडावेगळं केलं. त्यानंतर हे शीर हातात घेऊन मोठा विजय मिळवल्याच्या आर्विभावात तो गावभर हिंडला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे लेकासोबत लेकीला तिच्या सासरी भेटायला गेलेल्या संबंधित पीडितेच्या आईला या सर्वांची पूर्वकल्पना होती.
समाजातील स्त्री-पुरुषांची मानसिकता बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु, यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती लागते तचिाच अभाव दिसून येत आहे. आपण आज एकविसाव्या शतकात वावरतो. कला, विज्ञान, तंत्रज्ञान यांसारख्या अनेक क्षेत्रात आपण प्रगती केली. तरीही आपल्या देशात महिला सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवतो. महिलांची छेडछाड, विनयभंग, लैंगिक छळ यांसारख्या घटना नेहमी होताना दिसतात. याला जबाबदार कोण? महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाय योजना राबवल्या आहेत. कायदा सुव्यवस्था यामध्ये महिलांसाठी अनेक तरतुदी आहेत, पण माहितीच्या अभावामुळे त्यांचा योग्य वापर होताना दिसत नाही. या सर्वांवर उपाय म्हणजे समाजाची मानसिकता बदलणं. महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी सर्व महिलांनी एकजूटीने पुढे येणं गरजेचं आहे. तसंच पालकांनीही आपल्या मुलांच्या मनात स्त्रियांविषयी आदरभाव निर्माण करणं गरजेचं आहे. सर्व क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत तरीही त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, हे वास्तव अत्यंत संतापजनक आहे. आजपर्यंत सर्वच थरांत महिला सुरक्षेच्या प्रश्नांवर फक्त चर्चा होताना दिसते, मात्र ठोस पावलं उचलली जात नाहीत. महिला असुरक्षित असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पुरुषी मानसिकता. आज कित्येक महिलांना, मुलींना रोज याच मानसिकतेचा सामना करावा लागतो. हे चित्र बदलण्यासाठी महिलांवरील अत्याचाराविरुद्ध आवाज बुलंद करून एकत्रित यायला हवं. पोलीस, रुग्णालय व इतर प्रशासनाकडून पीडितांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे सुरक्षिततेसाठी कठोर पाऊलं उचलण्याची गरज आहे असं मला वाटतं. तसंच महिलांनी एकत्र येऊन अत्याचार कमी करण्यासाठी पुरुषी भान जागं करण्याची आवश्यकता आहे.
त्याचबरोबर सरकारने काही कठोर शिक्षा अंमलात आणाव्यात जेणेकरून वाईट प्रवृत्ती स्त्रियांपासून दूर राहिल्या पाहिजेत. तसंच अशा वाईट प्रसंगातून सावध होऊन स्त्रिया सक्षम होऊन अशा गलिच्छ विकृतीं विरोधात लढत आहेत. या त्यांच्या क्षमतेला अनेक गोष्टींची जोड मिळते तरीही गुन्हेगाराला कठोर शिक्षा सुनावली पाहिजे. तेव्हा कुठे आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना आणखीन सुरक्षित वाटेल. या सगळ्यासाठी नुसतं विचार करून उपयोग नाही तर त्यापलीकडे अंमल हवा. आणि जर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना अशा घटनांना न्याय देण्यासाठी काही करता येत नसेल तर आम्हा स्त्रियांच्या हातात कायदा द्यावा. जेणे करून एखाद्या नराधमाने असे वाईट दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच एक वाघीण बनून आम्ही त्या नराधमांचा जागीच फडषा पाडू. आणि कुठल्याच शिक्षेस आम्ही पात्र नसू. आणि हे जर तुमच्या कडून होतं नसेल तर आम्हा महिलांना एक दिवस ‘फुलन देवी’ होऊन हाती शस्त्र घेण्यास तुम्हीच आम्हाला भाग पाडलं असं म्हणायला तो दिवस दूर नाही.

(लेखिका या स्त्रीयांच्या हक्कांविषयी जागृक व संवेदनशील लेखिका, पत्रकार व वृत्तनिवेदिका आहेत. संपर्क ७२४९१८४०५९)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!