सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – छत्रपती संभाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगितला जातोय. जिजाऊंच्या संस्कारामुळे शंभुराजे घडले. स्वराज्याचे रक्षण करण्याचे काम छत्रपती संभाजीराजे यांनी केले. शूरवीर शंभुराजे स्वराज्य रक्षक होते, असे मत प्रसिद्ध विचारवंत व व्याख्याते सुरेश पवार यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, शिक्षणाधिकारी जावेद शेख, शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी, व्याख्याते सुरेश पवार, शिक्षक संघाचे नेते म. ज. मोरे, अनिरुद्ध पवार, राम शिंदे प्रमुख उपस्थित होते.
सर्व लढाया जिंकणारा राजा. वयाचे १६ व्या पहिली लढाई जिंकणारा शंभुराजा हे स्वराज्याचे रक्षक होते. वयाच्या नवव्या वर्षी हजरजबाबी असणारे राजे छत्रपती संभाजी राजे यांच्याकडून एक दिवसाचा किल्ला घेऊ म्हणणारे शहाबुद्दीन खानला अडीच वर्षे किल्ला घ्यायला लागले. औरंगजेबाने शहाबुद्दीन खानला लेखी प्रश्न विचारला होता. एक दिवस किती वर्षाचा आहे. छत्रपती संभाजी राजे न्यायाधीष्ठीत राजे होते. स्वाभिमानी होतें. छात्रधर्म अजरामर करणारा राजा होता. गुजरात मध्ये राहणारी गुजराथी, बंगाल मध्ये बंगाली तसा महाराष्ट्रात राहणारा मराठा आहे, असेही सुरेश पवार यांनी सांगितले.
या प्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, हिंदी, संस्कृत, मराठी या भाषेत छत्रपती संभाजीराजे यांनी लेखन केले आहे. स्त्रीयांना अधिकार देणारे राजे, साहित्यिक संभाजीराजे माहिती करून घ्या. असे आवाहन स्वामी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गुरव व आभार मराठा सेवा संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी मानले.
याप्रसंगी जिल्हा परिषद कास्ट्राईब संघटचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजेश देशपांडे, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे लक्ष्मण वंजारी, सचिन जाधव, सचिन साळूंखे, सुभाष कदम, सदाशिव पवार, दत्ता (मामा) मुळे, लक्ष्मण महाडीक, चंद्रकांत होळकर, संतोष जाधव, आप्पासाहेब भोसले, संतोष शिंदे, अजित देशमुख, भूषण काळे, आशिष चव्हाण, प्रशांत लंबे, दत्तात्रय भोसले, प्रभाकर माने, लक्ष्मण काटीकर, शाम पाटील, राजेंद्र माने, माधुरी भोसले, संदीप खरबस, चेतन भोसले, विजय कुलकर्णी, प्रदिप सुपेकर, वासुदेव घाडगे, अविनाश भोसले, राजु मानवी, राजु देशमुख, सचिन पवार, उमेश खंडागळे, महेंद्र माने, ऋषिकेश जाधव, गोपाळ शिंदे, सौरभ डोगरे हणमत पवार, प्रकाश ननवरे,सचिन चव्हाण, अंबादास सपकाळे, राम माने, राजु व्यवहारे, प्रकाश डोंगरे, परशुराम पवार, दत्ता शिंदे, नितिन मोहिते आदी उपस्थित होते.