सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती शौचालये बांधण्यात आले, त्याचा वापर किती करण्यात येतो, याच्यासाठी शासनाकडून किती निधी येतो, याबाबत सध्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या विभागाकडे माहिती देणे बाबत वरिष्ठ अधिकार्यांपासून ते खालच्या कर्मचारी यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे या विभागाच्या कामकाजाबाबत संशय निर्माण होत आहे.
स्वच्छ भारत अभियान विभागाचे मुख्य कामकाज म्हणजे जिल्ह्यात शौचालयाचा वापर करून स्वच्छता राखणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे, कचरा निर्मूलन करणे आदी प्रमुख जबाबदारी आहे. परंतु या विभागाचे कामकाजाबाबत विचारणा करण्यासाठी विभाग प्रमुख इशाधिन शेळकंदे यांच्याकडे गेले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यामुळे या विभागाचा कारभार आंधळा तर सुरू नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, स्वच्छ भारत अभियानासाठी राज्य शासनाकडून व केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली जाते. हा निधी नेमका कुठे वापरला जातो, का केवळ कागदी घोडे नाचविले जाते अशी चर्चा सध्या सुरू आहे. सध्या स्वच्छ भारत अभियानाची जबाबदारी उपमुक्त कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांच्या खांद्यावर आहे. परंतु शेळकंदे यांच्याकडे ग्रामपंचायत, प्रशासन आणि स्वच्छ भारत अशा तीन विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे आता इशादिन शेळकंदे साहेब दिशाहीन तर झाले नाहीत ना? कारण प्रत्यक्षात कंत्राटी कर्मचारीच स्वच्छ भारत विभाग चालवित तर नाही ना? अशी चर्चा सध्या झेडपीत रंगली आहे.
उघड्यावर शौचालय बसणार्यावर कारवाई करू – शेळकंदे
सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये शौचालय बांधकाम आणि शौचालयाचा वापर केला जात आहे. तरी उघड्यावर शौचालय कोणत्या गावात बसत असतील तर त्याची माहिती सांगा. त्यावर आपण त्वरित कारवाई करू.
– इशाधिन शेळकंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी
———————