BULDHANACrimeVidharbhaWomen's World

बुलढाण्यात ‘सौभाग्य’ धोक्यात! ‘चेन स्नॅचिंग’च्या घटना वाढल्या!

बुलडाणा (प्रशांत खंडारे) – सौभाग्याची मुख्य खूण म्हणजे मंगळसूत्र! हे सौभाग्य ही धोक्यात आले आहे. गत वर्षात २० ते २२ मंगळसूत्र चोरीच्या घटना बुलडाणा जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांतर्गत घडल्या. तर आज सकाळी एका महिन्याच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात दुचाकी स्वाराने पळवली. दहा दिवसांपूर्वी चिंचोली चौकातून एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली होती दरम्यान व्यसन पूर्ण करण्यासाठी मोठ्यांसह अल्पवयीन मुले दरोडेखोरी, मोबाईल,मोटरसायल,मंगळसूत्र चोरी सारख्या गुन्हेगारीकडे वळल्याचा निष्कर्ष पुढे येत आहे.

जिल्ह्यात गतवर्षी २१० चोरीच्या घटना समोर आल्या. यामध्ये २ कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला. दरोडेखोरीच्या १४ घटना उघडकीस आल्या. यात ३९ लाख ६२ हजार रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ करण्यात आला. वाहन चोरीचा धुमाकूळ सुरू आहे.  त्या पाठोपाठ मंगळसूत्र चोरही सक्रिय झालेत. चोरट्यांनी २० ते २२ महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकवून घेतले. पोलिसांनी काही चोरट्यांना अटक करून मुद्देमाल जप्तही केला. २०२२ वर्षात १० टक्के घटनांचा उलगडा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ‘चेन स्नॅचिंग’ अर्थात सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.आज, सोमवारी सकाळी राम मंदिरातून दर्शन घेऊन घरी परत जात असलेल्या एका महिलेला अज्ञात दुचाकीस्वाराने अडवले. एका घराचा पत्ता विचारत त्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडले. तीन तोळ्यांचा दागिना घेऊन तो क्षणात पसार झाला. तारा टावरी असे महिलेचे नाव आहे. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.


यापूर्वी, रविवारी रात्री ८ वाजतादरम्यान चिखली मार्गावरील गोडे यांच्या निवासस्थानाच्या मागील बोळीत रेखा संदेश तायडे यांच्या गळ्यातील पोत समोरून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी हिसकावून नेली. तीन तोळ्याच्या पोतचा अर्धा भाग तुटून जमिनीवर पडला. जेमतेम दहा दिवसांपूर्वी चिंचोली चौकात मंजू खोब्रागडे यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली होती. याचा तपास अधांतरी असतानाच दोन महिलांचे दागिने हिसकावण्यात आले आहे. यामुळे सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांना प्रतिबंध लावण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी विशेष पथक नेमावे, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!