सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे शनिवारी रुजू झाले आहेत. गेल्या दीड महिन्यामध्ये त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचा संपूर्ण भार तत्कालीन तथा झेडपीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्या खांद्यावर होता.
सीईओ स्वामी हे प्रशिक्षणासाठी मसुरी येथे गेल्या दीड महिन्यापासून गेले होते. त्यांनी आपल्या पदभार कोहिणकर यांच्याकडे दिला होता. शनिवारी त्यांनी हा पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे शनिवारी माध्यम प्रतिनिधी यांनी तत्कालीन सीईओ कोहिणकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की दीड महिन्यांमध्ये कोणाचीही तक्रार आली नाही. या दीड महिन्यामध्ये जवळपास १०० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये विशेषता समाज कल्याण विभागाच्या ५२ कोटी रुपये कामांना प्रशासकीय मंजूर देण्यात आली. तसेच जलसंधारण विभाग १० कोटी च्या आसपास मंजुरी देण्यात आली. तसेच कृषी विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा योजना याचे लाभार्थी देखील जवळपास निश्चित झाले आहेत. आरोग्य, शिक्षण या विभागाच्या कामाला मजूर देण्यात आली. त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटी जवळपास ८० टक्के निधी खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे माझ्या कार्यकाळात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य भरतीची प्रक्रिया देखील झाली असल्याची माहिती कोहिणकर यांनी दिली.
प्रशासनाला कोहिनकर यांच्या कामाचा लागला लळा!
सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिणकर दीड महिन्यांमध्ये जे काम केले त्याचा लळा जिल्हा परिषदेचे सर्व विभाग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कर्मचारी यांना लागला आहे.