KARAJATPachhim Maharashtra

मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय मेळावा कर्जतमध्ये

कर्जत (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय पत्रकारांचा मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळा दि. ७ एप्रिल रोजी कर्जत जिल्हा अहमदनगर येथील शारदाबाई पवार सभागृहात होणार असून, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी करून कर्जत येथे नियोजनाची बैठक घेतली. यावेळी शोभनाताई देशमुख, राज्य सरचिटणीस मन्सूरभाई शेख, विजयसिंह होलम, डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, बीड जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिरसाट, बीड जिल्हा कार्याध्यक्ष दिनकर शिंदे आदीसह कर्जतमधील पत्रकार गणेश जेवरे, आशिष बोरा, योगेश गांगर्डे, भाऊसाहेब तोरडमल, मच्छिंद्र अनारसे, मोतीराम शिंदे, अस्लम पठान आदीसह जामखेडचे पत्रकार अविनाश बोधले, सुदाम वराट, अशोक वीर, किरण रेडे, पप्पूभई सय्यद, आदी उपस्थित होते.

दिनांक २४ मार्च २०२३ रोजी देशमुख यांचे सह सर्वांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी करताना महाराष्ट्रातून येणार्‍या पत्रकाराच्या राहण्यासह इतर व्यवस्थेचा आढावा घेतला, या कार्यक्रमाचे आ. रोहित पवार हे स्वागताध्यक्ष असून त्यांनीच कर्जत येथे हा कार्यक्रम नूतन शारदाबाई पवार सभागृहात व्हावा यासाठी आग्रह धरला, या सभागृहाचे उपस्थित सर्वांनीच कौतुक करत तालुका स्तरावर इतके सुंदर सभागृह ग्रामीण भागात कुठेही नसल्याचे म्हटले. यावेळी कर्जत जामखेड एकात्मिक फौंडेशनचे व्यवस्थापक शितोळे, दादा पाटील महाविद्यालयाचे प्रा. संतोष लगड हे उपस्थित होते. या पाहणी नंतर लकी हॉटेल या ठिकाणी सर्वाची बैठक झाली. यावेळी गणेश जेवरे यांनी सूत्रसंचलन केले देशमुख यांनी बोलताना संघटनेचे महत्व विशद करताना देशातील क्रमांक दोनची ही संघटना असून, पत्रकारांच्या संघटना अनेक असल्या तरी पत्रकाराचे प्रश्न समान आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र यायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करताना या कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली. शेवटी आशिष बोरा यांनी कर्जत तालुक्यातील विविध देवस्थान व पर्यटन स्थळाची माहिती देऊन सर्वाचे आभार मानले. कर्जत तालुक्यात होणार्‍या राज्यस्तरीय या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी सर्वजण सहकार्य करतील, असा विश्वास कर्जत मधील पत्रकारांनी उपस्थित सर्वांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!