BULDHANAVidharbha

‘रमजान’मध्ये सत्कर्माचा मोबदला अनेक पटींनी वाढतो – ठाणेदार गावंडे

चांडोळ (प्रतिनिधी) – रमजान महिना मस्लीम बांधवांचा पवित्र महिना समजल्या जातो. याच रमजान महिन्यात प्रत्येक सत्कर्माचा मोबदला अनेक पटींनी वाढतो. या महिन्यात, एक रकत नमाज अदा केल्याने ७० पटीने पुण्य मिळते. यासोबतच दोजख (नरकाचे) दरवाजेही या महिन्यात बंद होतात, अशी धारणा आहे. त्यामुळे हा संपूर्ण महिना व महिन्याच्या शेवटी साजरी केली जाणारी रमजान ईद भाईचारातून साजरी करा, असे आवाहन ठाणेदार मनिष गावंडे यांनी केली.

धाड पोलीस स्टेशनच्यावतीने २३ मार्च रोजी सायंकाळी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला मार्गदर्शन करतांना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. यावेळी शांतता समितीचे सदस्यख पत्रकार बांधव व धाड नगरीतील सर्वच मशिदीचे इमाम व मशिद कमिटीचे अध्यक्ष उपस्थित होते. उत्सव कोणत्याही धर्माचा असो, त्यामध्ये सर्वच धर्मीय स्वखुशीने सहभागी होवून उत्सव साजरा करतात आणि जातीय सलोखा कायम ठेवतात, असा धाडचा इतिहास असल्याची माहिती शांतता समितीच्या काही जेष्ठ सदस्यांनी बैठकीत दिल्यानंतर ठाणेदार गावंडे यांनी धाडवासीयांच्या भाईचाराचे कौतुक करत भविष्यातही असाच सलोखा कायम ठेवा. सोबतच उत्सवात कोणताच अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलीस प्रशासन दक्ष असुन आपणही काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, रमजान महिन्यात वस्तु खरेदीसाठी रात्री उशीरापर्यंत बाजारपेठ सुरु ठेवण्याची विनंती बैठकीत समोर आली. त्यावर बोलतांना मी ठाणेदार म्हणून सुत्रे स्विकारल्याच्या दिवशीच १० वाजता मार्केट बंद करण्याचा घेतलेला निर्णय माझ्या नव्हे तर गावाच्याच हितासाठी घेतलेला आहे. कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीने गावकर्‍यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगत मार्वेâट बंद करण्याच्या वेळेत कोणताच बदल करणार नाही. मात्र, मशीद परिसरातील दुध डेअरी, बेकरी, फळांची दुकानांसाठी रात्री साडेदहापर्यंत वेळ वाढवून देत मुस्लीम बांधवांच्या भावनांचा आदर केल्याने उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी शांतता समिती सदस्य मोठ्या संख्येणे उपस्थित होते.
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!