आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील मरकळ उद्योगनगर मधील मास फ्लॅनज इंडिया कंपनीत प्रत्येक करार करण्यास व्यवस्थापन कायम उशीर करीत असून यातून कामगारांची पिळवणुक करीत असल्याने कंपनी कामगार करारास विलंब प्रकरणी नाराज असून येत्या काळात करार न केल्यास अन्नत्याग आंदोलन छेडतील असा इशारा कामगार युनियनतर्फे देण्यात आला आहे.
प्रत्येक वेळी चालु करारावर चर्चा करताना वेगवेगळे नवीन मुद्दे आणून चर्चा व करार लांबविला जात असल्याने कामगारांत तीव्र नाराजी आहे. करार करताना चर्चा सकारात्मक वहीवी अशी माफक अपेक्षा कामगार व्यक्त करीत आहेत. या संदर्भांत कामगारांनी पुणे कामगार आयुक्त यांचा कडे मध्यस्थी करण्यास साकडे घातले आहे. मात्र तिकडे ही अद्याप कोणताच मार्ग निघाला नसल्याने प्रकारां करार वाद आता न्यायालया पर्यंत पोहोचला आहे.
कामगारांनी करारास विलंब होत असल्याने कंपनी व्यवस्थापनाचे विरोधात एकत्र येऊन काळ्या फिती बांधुन जाहीर निषेध देखील केला आहे. या कंपनीतील सर्व कामगार हे शिवगर्जना कामगार संघटनेचे सभासद असुन त्यांनी युनियन अध्यक्ष संतोष आण्णा बेंद्रे यांच्या नेतृत्वात करार व्हावा यासाठी आंदोलन सुरु केले आहे. या पुढील काळात व्यवस्थापनाने सकारात्मक मार्ग न काढल्यास कामगार अन्नत्याग आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे. मात्र हे आंदोलन करीत असताना कामगार कंपनीच्या उत्पादनावर तसेच उत्पन्नावर कोणताच परिणाम होऊन देणार नसल्याचे सांगितले आहे. सर्व कामगार आपापले दिलेले काम आहे त्या प्रमाणात प्रामाणिक पणे करत राहणार आहेत. काम कमी करण्याचा सद्या कोणताच हेतू नसल्याचे कामगार युनियनने स्पष्ठ केले आहे. मात्र भविष्यात करार होण्याचे मार्गावरील अडथळे दूर न झाल्यास करारासाठी तीव्र आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.