Breaking newsBULDHANAHead linesLONARMEHAKARVidharbha

मेहकर पेटविण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला!

- शहरात तणावपूर्ण परिस्थिती; २३ आरोपींना अटक, संचारबंदी लागू!

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – मेहकर-लोणार मतदारसंघात शिवसेना (ठाकरे) पक्षाचे सिद्धार्थ खरात हे निवडून आल्यानंतर शहरातील काही असमाजिक तत्वांनी शहर दंगलीच्या आगीत भडकविण्याचा प्रयत्न करून पाहिला. परंतु, महसूल प्रशासन व पोलिसांनी मोठ्या सतर्कतेने हा प्रयत्न उधळून लावला आहे. सद्या शहरात तणावपूर्ण शांतता असून, २३ तारखेच्या मतमोजणीनंतर दि.२४ नोव्हेंबररोजी रात्री दोन गट आमने-सामने आल्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात सहा गाड्या पेटवण्यात आल्या. दगडफेकही झाली. यामुळे पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत, शहरात शांतता प्रस्थापित केली असून, २३ दंगलखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सद्या शहरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.

मेहकरमध्ये दोन गटांत तणाव, गाड्यांची जाळपोळ, दगडफेकीनंतर पोलीस आक्रमक, 23 आरोपींना अटक, संचारबंदी लागूसविस्तर असे, की मेहकरमधील माळीपेठ भागासह इतर काही भागांमध्ये रविवारी रात्री वाहने पेटवून दिली होती. तसेच मारहाणीच्या घटनाही घडलेल्या होत्या. दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या भागांत बंदोबस्त वाढवला. संचारबंदी लागू केली. मेहकर शहराच्या सर्व सीमा बंद केल्या. या दंगली प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २३ आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. तसेच इतर दंगलखोरांचा शोध घेतला जात आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. शहरात जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर, बाजारपेठ बंद आहे. उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांनी संचारबंदीचे आदेश काढले आहेत. कलम १४४ लागू केले आहे. त्यामुळे रविवारी रात्रीपासून संपूर्ण शहरात संचारबंदी लागू झाली आहे. शहरात तणावपूर्ण शांतता आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मेहकरमध्ये जाळपोळ झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हे व्हिडिओ बाहेरील तसेच जुने असल्याचा संशय आहे. काहीजण मुद्दामहून तणाव निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता सोशल मीडियावर लक्ष ठेवले आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मेहकर शहरात दंगलीची शक्यता, मनाई आदेश लागू; नगरपरिषद हद्दीतील सीमाही सील!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!