– अज्ञात पाच महिलांविरूध्द डोणगाव पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपींचा कसून तपास सुरू!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – एसटीमधून प्रवास करत असताना महिलेचे दोन लाखाचे दागिने लंपास केल्याची घटना मेहकर तालुक्यातील गोहोगाव फाट्याजवळ २१ फेब्रुवारीरोजी घडली होती. याप्रकरणी अज्ञात चार ते पाच महिलांविरूध्द ड़ोणगाव पोलिस ठाण्यात १ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील विवाहिता सौ. अश्विनी प्रदीप अल्हाट (वय २४) ह्या आपल्या भावाच्या लग्नासाठी वारा जहॉगीर जि.वाशिम येथे जाण्यासाठी मेहकर येथून नाशिक ते वाशिम बस क्र.एमएच २० बीएल ४१५० मध्ये बसल्या होत्या. प्रवासादरम्यान कानातील झुमके, गहूमणी पोथ, दोन अंगठ्यांसह अंदाजे १ लाख ९५ हजाराने दागिने असलेला प्लॅस्टीक ड़बा हा त्यांच्या जवळील कप़ड्याच्या बॅगमध्ये ठेवलेला होता. त्यांच्या बाजूलाच अज्ञात चार ते पाच प्रवासी महिलाही होत्या.
यादरम्यान पती प्रदीप अल्हाट यांचा फोन आल्याने सदर विवाहिता ड़ोणगावजवळील गोहोगाव फाट्यावर उतरल्या. यावेळी बॅगमधील सामानाची पाहणी केली असता चैन उघड़ी असून, उपरोक्त कितीचे दागिने असलेला ड़बा गायब झाल्याचे दिसले. याप्रकरणी सौ.अश्विनी प्रदीप अल्हाट यांनी दिलेल्या तक्रारीवरून ड़ोणगाव पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३७९ नुसार अज्ञात चार ते पाच महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ठाणेदार नीलेश अपसुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ गजानन ठाकरे हे करीत आहेत.