आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : खूप वर्षा नंतर आलेल्या हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शिवसेना प्रथम खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकतीने लढणार असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख विपुल शितोळे यांनी सांगितले.
गेल्या आठ महिन्यांमध्ये राज्यात सत्ता संघर्ष सुरू असताना शिरूर लोकसभा मतदारसंघां मध्ये प्रथम खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यांच्या सोबत अनेक हवेली तालुक्यातील विश्वासू सहकारी त्यांच्या सोबत शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये दाखल झाले, आज गेली सात महिन्यांमध्ये हवेली तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात उरुळी कांचन येथे झालेला व वाघोली येथे झालेला शिवसेनेच्या मेळाव्याला झालेली गर्दी हे मोठे बोलके चित्र तालुक्या समोर उभे राहिले आहे आणि यामुळे आढळराव पाटील यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.
हवेली तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतचे सदस्य व विविध विकास कार्यकारी सोसायटीचे सदस्य यांचा शिवसेने मध्ये प्रवेश करून घेऊन माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी आपले नेतृत्वाची चमक दाखवलेली आहे. हवेली तालुक्यामध्ये आढळराव पाटील यांचे कट्टर समर्थक विपुल शितोळे यांना शिवसेना हवेली तालुका प्रमुख पदाची जबाबदारी घेतल्यानंतर तालुक्यामध्ये मोठ्या सभा घेऊन झंजावात निर्माण करून दोन मोठ्या सभा घेतल्या. मुंबईमध्ये सुद्धा युवा नेते अलंकार कांचन पाटील व गणेश सातव पाटील या युवा नेत्यांचा प्रवेश मोठ्या उत्साहामध्ये आणि गर्दीमध्ये घेऊन हवेली तालुक्याची चमक मुंबईमध्ये दाखवली.
अनेक दिग्गज नेते आजही शिवसेनेच्या आणि शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या संपर्कामध्ये आहे. त्यामुळे येणाऱ्या बाजार समितीचे निवडणुकीमध्ये शिवसेना महत्त्वाच्या भूमिकेमध्ये असेल यात काही शंका नाही. याविषयी बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख यांनी सांगितले. अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते बाजार समितीच्या निवडणुकी विषयी आमच्या संपर्कामध्ये आहेत. नेत्यांशी संपर्क करून आणि त्यांच्याशी बोलून पुढचा निर्णय घेतला जाईल. परंतु येणारी बाजार समिती निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकतीने उतरेल या शंका नाही. अशी भूमिका शिवसेनेची असल्याचे त्यांनी सांगितले.