Uncategorized

अन्न व औषध प्रशासनाचा गुटखा विक्रेत्यावर छापा!

बुलढाणा(खास प्रतिनिधी) – अवैध गुटखा विक्रीला जिल्ह्यात उधाण आले असताना, स्थानिक अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने लोणार येथे प्रतिबंधित गुटखा विक्रीप्रकरणी एकाला ताब्यात घेउन त्याच्याविरोधात आज, १६ फेब्रुवारीला अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे. सदर विक्रेत्याकडून ४६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बुलढाणा जिल्ह्यात गुटखा विक्री जोमाने सुरू आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी रवींद्र सोळंके यांनी विठु माऊली किराणा दुकान, लोणार येथे सकाळी ११ वाजता अचानक छापा टाकला असता, या दुकानात प्रतिबंधीत अन्न पदार्थ नजर, विमल पानमसाला, राजनिवास, जफरानी जर्दा, आरजेफ्लेवर पान मसाला, आरओ पेवींग तंबाखू, बाजीराव गोड पान मसाला विक्री होत असल्याचे व साठवून ठेवल्याचे निदर्शनास आले. जप्त केलेल्या या अन्न पदार्थाची एकूण किंमत ४६ हजार १५८ रुपये इतकी आहे. हा साठा जप्त करुन दुकानाचा मालक धरमचंद अमरचंद लुनिया याचे विरुद्ध लोणार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुकानदारांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा कलम २६ (२) (ग्), २६ (२) (ग्न्),२७(३)(्),२७(३)(E),३(१)(२२)(१),३०(२) ए) इ. तसेच भा. दं. वि. चे कलम १८८, २७२, २७३,३२८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुलढाणा अन्न व औषध प्रशासन अधिकारी रवींद्र द्वारकादास सोळंके व सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद अहिरे व त्यांची टीम पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!