BULDHANAHead linesVidharbha

शिवजन्मोत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात; गड-किल्ल्यांच्या प्रदर्शनाला सुरुवात!

बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – मराठी मनांची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हर्षोल्हासात साजरी करण्यासाठी जय्यत नियोजन जन्मोत्सव समितीने केले आहे. कार्यक्रमासाठी लागणारा भव्य शिवमंच उभारणीचे काम सुरू झाले असून, तयारी अंतिम टप्प्यात आहे. जिजामाता क्रीडा संकुल बुलढाणा येथे नगरपालिका मुख्याधिकारी गणेश पांडे, शिवप्रेमी राजेश हेलगे, डॉक्टर सौ. सुषमा राजेश हेलगे व आदिती अर्बनचे शेजवळ दांपत्य यांनी सपत्नीक भूमिपूजन केले. यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी एकच शिवघोष केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचे शिवधनुष्य समितीचे अध्यक्ष डॉ. शोन चिंचोले व सचिव सुनील सपकाळ यांनी उचलले आहे. त्यांच्यासह समितीचे माजी अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, राजेश हेलगें, डॉक्टर राजेश्वर उभरंहडे, सागर काळवाघे, एडवोकेट जयसिंगराजे देशमुख, मृत्युंजय गायकवाड ,प्राध्यापक अनिल रिंढे व सर्व समित्यांचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून नियोजन पूर्ण झाले आहे. जिजामाता क्रीडा संकुल येथे समारंभासाठी लागणार्‍या भव्य शिव मंचाचा सकाळच्या प्रहरी शुभारंभ करण्यात आला. भूमिपूजनाच्या वेळी मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी शिवजन्मोत्सव लोकोत्सव झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. शिवकार्य म्हणजेच देश कार्य असल्याचे सांगून पांडे यांनी शिवचरित्रावर प्रकाश टाकला.

वेगवेगळ्या दालनांची निर्मिती
शस्त्र प्रदर्शनीसाठी स्वतंत्र दालनाची निर्मिती केली आहे. जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून येणारे शाळांचे विद्यार्थी व प्रदर्शनासाठी होणारी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहता समितीने याचे स्वतंत्र नियोजन करून ठेवले आहे. १७फेब्रुवारी रोजी शस्त्र व गड किल्ल्यांच्या चित्रप्रदर्शनेचे उद्घाटन जिजाऊ मॉसाहेबांचे वंशज शिवाजीराव जाधव हे करणार आहे.

अश्वप्रदर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था
याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रजातीच्या अश्व प्रदर्शनीची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी भव्य मंडपाची उभारणी केली आहे. यामध्ये देशातील वेगवेगळ्या प्रजातींचे अश्व बघायला मिळतील तर प्रमुख समारंभासाठी वेगळा व भव्य असा शिवमंच राहणार आहे. शिवमंच पूजनाचा कार्यक्रम आज पार पडला. यावेळी उत्सव समितीचे सर्व माजी अध्यक्ष तसेच अदिती अर्बन चे सुरेश देवकर,प्राचार्य शाहिणाताइ पठाण प्रा. एन यच पठाण, प्राचार्य सुनील जवंजाळ, डॉ. राहुल हिवाळे, विजयाताई काकडे, अनिताताई कापरे, शैलेश खेडकर, गौरव देशमुख, प्राचार्य ज्योती पाटील, अंजली परांजपे, वैशाली ठाकरे, दामोदर बिडवे, चंद्रकांत बरदे, सोनवणे मॅडम, रवी पाटील, स्वाती कणेकर ,प्राध्यापक गोपाल सिंग राजपूत, वैशाली तायडे, एडवोकेट रामेश्वर रामाने, डॉ. योगेश शेवाळे ,सौ आरती जोशी, सतीश खरात, पवन बारवेकर, ज्ञानेश्वर खांडवे,यांच्यासह समारंभाचे मानकरी असलेले केळवदकर गणेश निकम, नारायण वाणी, नंदु बोरबळे, राम हिंगे ,बाजीराव उन्हाळे, गोपाल वाघमारे, गणेश कालेकर आदींची उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!