SOLAPUR

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिबिरात १०७ जणानी केले रक्तदान

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – केगांव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणे व सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ कमलापूर चे संस्थापक अध्यक्ष प्रो. एम.एन. नवले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर झाले. या शिबिरात १०७ जणांनी रक्तदान केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ.रवींद्र व्यवहारे व डॉ शेखर जगदे, सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सुनीता जॉन्सन, उपप्राचार्य प्रकाश नवले, इस्टेट ऑफीसर डॉ. दत्तात्रय नवले यांच्या हस्ते झाले. या शिबिरामध्ये १०७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरामध्ये अक्षय ब्लड बँक व शासकीय ब्लड बँक सहभागी झाल्या होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. शशिकांत लमकाने, प्रा.सुरज धनवे व विद्यार्थी प्रतिनिधी अजय चौखंडे आणि साक्षी देशमुख यांनी परिश्रम घेतले.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!