Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

नागपूर विद्यापीठ ठरले चॅम्पियन!

– चार दिवशीय राज्यस्तरीय युवा महोत्सवाची यशस्वी सांगता

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात गेल्या चार दिवसांपासून रंगलेल्या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्ष महोत्सवाच्या सर्वसाधारण विजेतेपदाचे प्रथम बक्षीस २८ गुणांसह संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठास मिळाले. सर्वसाधारण विजेतेपदाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक २७ गुणांसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस २३ गुणांसह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास मिळाले.

पुणे दुसरे

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तेराव्या राज्यस्तरीय उत्कर्ष सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन सोलापूर विद्यापीठ कॅम्पस येथे करण्यात आले होते. गुरुवारी पारितोषिक वितरणाने महोत्सवाचा समारोप झाला. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सोलापूरचे जागतिक ख्यातीचे सुंदरी वादक पंडित भीमण्णा जाधव आणि जेष्ठ पत्रकार तथा सकाळचे सहयोगी संपादक अभय दिवाणजी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य ब्रँड अँबेसिडर (सदिच्छा दूत) प्रिया पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थिती होती. याप्रसंगी व्यासपीठावर कुलसचिव योगिनी घारे, वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणिक शहा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. गुणवंत सरवदे हे ही उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले. गोल्डन बॉय व गोल्डन गर्लच्या मानपत्राचे वाचन प्रा. ममता बोल्ली यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर गुणवंत सरवदे यांनी आभार मानले.

सोलापूरला तिसरे बक्षीस

उत्कर्ष महोत्सवाचा निकाल :
(अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय)
शोभायात्रा: मुंबई विद्यापीठ मुंबई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
भित्तीचित्र: बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली.
कार्यप्रसिद्धी अहवाल: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती.
संकल्पना नृत्य: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ मुंबई.
पथनाट्य: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
समूहगीत: एसएनडीटी विद्यापीठ नागपूर, संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
लोकवाद्य: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद.
लोककला: संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद.
भित्तिचित्रे घोषवाक्यसह: संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती.
निबंध स्पर्धा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नागपूर.
वक्तृत्व स्पर्धा: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक.
काव्यवाचन: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव.
छायाचित्र स्पर्धा: संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली.
गोल्डन बॉय: कृष्णा रिटे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
गोल्डन गर्ल: श्रुती बोरस्ते, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
उत्कृष्ट संघनायक: संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर आणि एसएनडीटी विद्यापीठ मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!