SOLAPUR

समाज कल्याण लाभाच्या योजनेसाठी २ हजार अर्ज

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वेगवेगळ्या योजनेसाठी जिल्ह्यातून जवळपास २ हजार लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. परंतु या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड आणि खरेदीसाठी अधिकार्‍यांना ‘तन- मन’ झिजविल्याशिवाय खर्‍याअर्थाने लाभार्थ्यांना लाभ होणार नाही.

समाज कल्याण योजनेसाठी यापूर्वी ३१ नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली होती. परंतु वर्ष प्रमाणात अर्ज न आल्यामुळे पुढे आणखीन १५ डिसेंबर पर्यंत मुदत वाढविण्यात आले. नंतर आणखीन लाभार्थ्याची संख्या पूर्ण होत नसल्यामुळे आजही अर्ज घेण्याबाबत तालुक्याला सूचना देण्यात आले आहेत. परंतु परिपूर्ण प्रस्ताव येत नसल्यामुळे लाभार्थी निवडीची प्रक्रिया लांबवली जात असल्याचे दिसत आहे. समाज कल्याण विभागाकडून मुला- मुलीसाठी सायकल या योजनेसाठी जवळपास ४३५ अर्ज आले आहेत. तर पिठाची गिरणी यासाठी ५९५ अर्ज आले आहेत. झेरॉक्स मशीन सर्वसाधारण साठी २६३ जणांनी अर्ज केले आहेत. तर शिलाई मशीन साठी १७४ महिलांनी अर्ज केले आहेत. तर अपंग शेळी गट साठी ३०९ लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहे. पिठाची गिरणी साठी १९८ तसेच झेरॉक्स मशीन अपंगासाठी २१५ हर झाले असून अपंग अपंग विवाह पाच असे जवळपास दोन हजार लाभार्थ्यांनी लाभाच्या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहे. परंतु यामध्ये कोणाची निवड होणार आणि कोणाची नाही हे निधीवर अवलंबून राहणार आहे. या लाभाच्या योजनेसाठी जिल्हा परिषदेने सेस फंडातून जवळपास चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु आणखीन अर्जाची संख्या वाढल्यास बर्‍याच लाभार्थ्यांना लाभाच्या योजनेपासून वंचित रहावे लागणार आहे.


पिठाची गिरणी व मुला-मुली सायकलसाठी सर्वाधिक अर्ज
पिठाची गिरणी व मुला मुलीसाठी सायकल या योजनेसाठी सर्वाधिक जवळपास १ हजार सोलापूर जिल्ह्यातून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर अपंग शेळी गट यासाठी ३०९ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. तरी ज्या लाभार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी त्या तालुक्याला अर्ज दाखल करण्याचे आव्हान जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!