सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – खान फाउंडेशन आणि छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड पुणे यांच्यावतीने हाजी मतीन बागवान यांना आदर्श समाजसेवक पुरस्कारांने सन्मान करण्यात आले.
पुणे- खान एज्युकेशन फाउंडेशन आणि छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना समाजसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रसिद्ध हृदय विषारद डॉ. नरेश मुनोत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष बागवान यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी राजन नायर (ख्रिचन संघ पुणे), रहिमभाई सय्यद (पिंपरी चिंचवड), अझीम शेख (उस्मानाबाद), अनिल खुडे (रायगड), अर्चना कोल्हाटी (सातारा) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मान करण्यात आले. पुणे येथील कोरेगाव पार्कमधील मौलाना अबुल कलाम आझाद सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. याचे संयोजन गौसिया खान यांनी आयोजन केले होते.
या कार्यक्रमास फाउंडेशनच्या अध्यक्षा गौसीया खान, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष फिरोज मुल्ला, राज्यभरातील मान्यवरांसह सोलापूरमधील मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शफीक रचभरे, उपाध्यक्ष राजू हुंडेकरी, जावेद बद्दी, मुसदीक चौधरी, सरफराज शेख, कादर भागानगरी, बशीर सय्यद, अमजद पठाण, मोहसीन शेख उपस्थित होते.
—————-