साेलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – श्री. सिध्देश्वर देवस्थान संचलित श्री. सिद्धेश्वर इंग्लिश मिडियम प्री प्रायमरी स्कूल आणि प्रायमरी स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन हुतात्मा स्मृती मंदिर येथे सांस्कृतिक कार्यक्रमसह बहारदार गाण्यावर नृत्य अविष्कारने झाले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केंद्रिय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक संजय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्यध्यापक सतिश गोसावी, स्मिता कोरवर, निर्मला परमशट्टी, पटणे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अंबादास पोळ, अर्चना धोत्रे आदी होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्री प्रायमरी विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लता मंगेशकर यांच्या बहारदार गाण्यावर नृत्य अविष्कार करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांनी संपूर्ण भारताच्या विविध प्रदेशांमध्ये असणार्या बहारदार नृत्याचा अविष्कार सादर केला. कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी श्री सिद्धेश्वर शिक्षण समितीचे चेअरमन धर्मराज काडादी, सिद्धेश्वर शिक्षण समितीचे सदस्य राजशेखर येळेकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिला डांगे, आरती पंडित,सुनिता खडाखडे,नीता मोरडे यांनी केले तर कोमल परांजपे यांनी आभार मानले. या कार्यक्रमात अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल मधील इयत्ता चौथी या वर्गातील हर्षवर्धन नवले, अंजली माळगे या विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून पुरस्कार देण्यात आला. तसेच स्पोर्ट्स ऑफ द इयर हा पुरस्कार यशवर्धन गायकवाड या विद्यार्थ्याला देण्यात आला. सांस्कृतिक विभाग प्रमुख पुष्पा कत्ते व नीता मोरडे यांनी नियोजनबद्ध कार्यक्रमाची रूपरेषा आखली.