सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्हा परिषद महिला कर्मचारी युनियन अध्यक्षपदी अनुपमा पडवळे तर सचिवपदी निर्मला राठोड यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संघटनेच्यावतीने देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या महिला शाखेच्या पदाधिकार्यांचे गठण राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, विभागीय संघटक डॉ. एस. पी. माने, जिल्हाध्यक्ष तजमुल मुत्तवली, सचिव विलास मसलकर, सल्लागार श्रीशैल देशमुख, विशाल घोगरे संतोष शिंदे, राकेश सोडी, राजीव गाडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मृणालिनी शिंदे व अंगणवाडी पर्यवेक्षिका अध्यक्षा माधवी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. महिला कर्मचार्यांच्या स्वतंत्र समस्या व महिला कर्मचार्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदमध्ये महिला कर्मचारी युनियनची संघटन व निवड एकमताने करण्यात आले. लिंगराज यांनी या निवडी जाहीर केले. या निवडीनंतर राज्याध्यक्ष बलराज मगर, कार्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांनी अभिनंदन केले. महिलांसाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण झाल्याने सर्व महिला कर्मचार्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले. महिला कर्मचार्यांसाठी चांगले काम करण्याची भूमिका या सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना केल्या.
सचिव स्वाती स्वामी, कार्याध्यक्ष सोनाली कदम, सविता काळे, उपाध्यक्ष आरती माढेकर कनिष्ठ सहाय्यक, सहसचिव अंबिका वाघमोडे, कोषाध्यक्ष मृणाली शिंदे, मुख्य संघटक राजश्री कांगरे, प्रसिध्दी प्रमुख ज्योती लामकाने, कार्यकारणी सदस्य संगीता सुलगडले, ज्योती काटकर, अश्विनी सातपुते, पुनम नरसोडे, अंजु पाटील, फ़रजाना शेख, रेणुका प्रथमशेट्टी, सुचिता जाधव, सविता मिसाळ, अश्विनी दोरकर आदी महिला कर्मचार्यांची निवड करण्यात आली आहे.