BULDHANAChikhali

हिंदुत्ववादी संघटनांचा २ जानेवारीला बुलढाण्यात विराट मोर्चा!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – लव्ह-जिहाद, धर्मांतरण आणि वाढत्या गोहत्यांविरोधात तसेच समस्त हिन्दूंचे आराध्य दैवत, हिन्दवी स्वराज्य संस्थापक छत्रपति श्री शिवाजी महाराजांचा व राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्याच्या विरोधात कायदा व्हावा, ही रास्त मागणी घेऊन हिंदुंचा हिंन्दुंसाठी जिल्हास्तरीय हिंदू जनआक्रोश महामोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी हिंदुत्ववादी संघटनांची नुकतीच येथील विश्रामगृह येथे नियोजन बैठक पार पडली. दि.२ जानेवारी २०२३ रोजी बुलडाणा शहरात हा मोर्चा काढला जाणार आहे.

सदर मोर्चाला संबोधित करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून धनंजयभाई देसाई, कालीचरण महाराज यांचेसह, ह.भ. प.बाबुराव महाराज वाघ पंढरपूर, संतोषसिंह गहेरवाल अमरावती, शिव व्याख्यानकार भाग्यश्रीताई मोहिते यांचे मार्गदर्शन असणार आहे, सोबतच लव जिहाद बळी ठरलेल्या जोत्सनाताई नागरे यांचे आत्मकथन होणार आहे. सदर आयोजित मोर्चा यशस्वी करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला बजरंग दल विदर्भ प्रांत संयोजक अमोल अंधारे यांचेसह राजेश पिंगळे, विजय पवार, जयंती जोशी, दीपक वारे, सिद्धार्थ शर्मा, सौ.मेघना पेठे, सौ.पद्मजा अहिर, सौ.सुमन राजपूत, जोत्सना नागरे, श्रीकांत गायकवाड, दशरथसिंग राजपूत, अर्जुन दांडगे, राजेश माधवाणी, वैभव इंगळे, केशव बेंडवाल, हर्षल जोशी, उत्कर्ष डाफने, मनोज बैरागी, गजेंद्र अहिरे, किरण देशपांडे, नितीन बेंडवाल, निलेश मुठ्ठे, अजय मुट्ठे, जिग्नेश कमानी, शैलेश शर्मा, सचिन टेंभीकर, आशिष व्यवहारे, टिल्लू गोरले, अभिलाष चौबे, निलेश धंदर , रामेश्वर चव्हाण यांचे सह असंख्य हिंदुत्व वादी विचार सरणीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते,

समस्त हिंदु समाज, हिन्दू राष्ट्र सेना, विश्व हिंदू परिषद, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू महासभा, बजरंग दल, राष्ट्रीय बजरंग दल, आंतर राष्ट्रीय हिंदू परिषद, धर्मवीर आखाडा, जय भवानी मित्र मंडळ, महाबली युवा प्रतिष्ठान बुलढाणा, धर्मवीर युथ फाऊनडेशन, सद्भावना समिती, छावा मराठा संघटना, सनातन संस्था, मराठा महासंघ, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ विदर्भ प्रांत, युवा शाखा, वारकरी साहित्य परिषद, गायत्री महिला मंडळ, करणी सेना, हिंदुराष्ट्र सेना, आध्यात्मिक वारकरी आघाडी, युवा हिंदू प्रतिष्ठान, शिवकार्य प्रतिष्ठान, गौरक्षक दल यांच्यातर्पेâ सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!