SOLAPUR

सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ

साेलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रथम व द्वितीय तसेच तृतीय ते पाचव्या वर्षापर्यंतच्या विविध अभ्यासक्रमांसाठी परीक्षा फॉर्म भरण्याकरिता मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.

सर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम व द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांकरिता महाविद्यालयात व पदव्युत्तर अधिविभागांमध्ये दि. 24 डिसेंबर 2022 पर्यंत विनाविलंब शुल्क फॉर्म भरता येणार आहे. दि. 31 डिसेंबर 2022 पर्यंत विलंब शुल्कासहित फॉर्म भरण्याची सोय विद्यार्थ्यांकरिता आहे. तसेच इतर सर्व अभ्यासक्रमांच्या तृतीय ते पाचव्या वर्षांच्या विद्यार्थ्यांकरीता दि. 2 जानेवारी 2023 पर्यंत विनाविलंब परीक्षा अर्ज महाविद्यालय अधिविभागांमध्ये भरता येणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणपूर यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!