साेलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – दीनदलितांचे उद्धारक संत गाडगेबाबा यांची 66 पुण्यतिथी शहरातील श्री संत गाडगेबाबा निराधार बालक ट्रस्ट संचलित, श्रीसंत गाडगेबाबा माध्यमिक आश्रम प्रशाला आनंदनगर, कवठे (तालुका उत्तर सोलापूर) येथे साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थचे सचिव गणेश पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा लक्ष्मी पाटील, खजिनदार शैला पाटील तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले चेतन चौधरी, (चौधरी फांडेशन), सिध्दाराम उमदी, (आडत व्यापारी) सुजय निकले आदी मान्यवर व गावकरी मंडळी भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्याथ्याने गाडगेबाबा विषयी मनोगत तसेच व कवितेचे गायक केले. कार्यक्रमाप्रसंगी वक्तृत्व व निबंध स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्याच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरणाला निबंधाच्या माध्यमातून गाडगेबाबांचे जीवनचरित्र हस्तपुस्तिकेतून सादर केले. तसेच कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रमुख पाहुणे यांनी विद्याथ्यांना अश्विनीताई चव्हाण यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन करताना संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेविषयी माहिती सांगत असताना बाबांचे विचार आत्मसात करून जसे गावाची स्वच्छता तसी मनाची व शरीराची स्वच्छता ठेवावी. काशिनाथ राठोड प्राथमिक मुख्याध्यापक यांनी संस्थेची यशोगाथा आपल्या प्रास्ताविक मधून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संस्थेचे सहसचिव अक्षय पाटील यांनी केले व शेवटी गाडगेबाबांची आरती गीत म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य महादेव मोटे यांनी केले.