SOLAPUR

सोलापूर विद्यापीठाकडून गुरुवारपासून बार्शीत आविष्कार संशोधन महोत्सव!

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी व त्यांच्या संशोधन प्रकल्पाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता दि. 22 व 23 डिसेंबर 2022 रोजी बार्शी येथील एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनियरिंग येथे आविष्कार संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

गुरुवार, दि. 22 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता या अविष्कार संशोधन महोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्यासह संलग्नित विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनियरिंगचे प्रतिनिधी यांची उपस्थिती असेल. या अविष्कार संशोधन महोत्सवामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 414 विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार असून 395 पोस्टरचे यावेळी प्रेझेंटेशन होणार आहे. त्याचबरोबर 19 मॉडेल्सचे देखील सादरीकरण होणार आहे. विद्यार्थ्यांच्या या संशोधन प्रकल्पाच्या परीक्षणासाठी सोलापूर विद्यापीठ कार्यक्षेत्राबाहेरील तज्ञांना निमंत्रित करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी परीक्षकांकडून परीक्षण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यातील काही प्रकल्पांना सादरीकरणासाठी बोलावण्यात येणार आहे.

सादरीकरण झाल्यानंतर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस घोषित केले जाणार आहे. विजेत्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण राज्यस्तरीय संशोधन महोत्सवासाठी होणार आहे. या महोत्सवाचे नियोजन विद्यापीठातील इनोव्हेशन, इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. सचिन लड्डा, समन्वयक डॉ. विनायक धुळप, सहसमन्वयक डॉ. अशोक शिंदे त्याचबरोबर एमआयटी रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेजच्या संचालिका प्रा. स्वाती कराड, प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!