SOLAPUR

शिक्षण विभागातील वरिष्ठ कारकून बानूर यांच्या बदलीसाठी आमरण उपोषण

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ कारकून संजय बानूर यांची बदली करावी, या मागणीसाठी गेल्या २८ दिवसांपासून लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ दिंडोरे व मारुती जाधव यांनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी काही वादग्रस्त कर्मचार्‍यांच्या बदल्या करून साफसफाई केली होती. परंतु माध्यमिक शिक्षण विभागातील बानूर यांची बदली झालेली नाही. अशा वरिष्ठ कारकुन बानूर यांच्या बदलीची ऑर्डर काढणे आवश्यक आहे, अशी मागणी दिंडोरे व जाधव यांनी करून बानूर यांनी कोट्यवधी रुपये कमावल्याचा आरोप केला. बानूर यांच्याकडे फॉर्च्युनर गाडी, सोने, विमानाने प्रवास, तसेच कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचा आरोप करत, ही मालमत्ता एका कारकुनाकडे कशी आली, असा सवाल केला आहे. या बानूर यांच्याकडे शिक्षक मान्यतेचा व संख्या मान्यतेचे महत्वाचे टेबल आहेत, तरी बानूर यांची त्वरीत बदली करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील राजाभाऊ दिंडोरे व मारुती जाधव यांनी दिलेला आहे.
———————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!