Aalandi

तृप्तीताई देसाई यांची आळंदी इंटरसिटी सर्व्हिसेस कार्यालयास सदिच्छा भेट

आळंदी (प्रतिनिधी) – भूमाता ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई यांनी आळंदी इंटरसिटी सर्व्हिसेस कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी संचालक पत्रकार अर्जुन मेदनकर यांचे हस्ते तृप्तीताई देसाई यांचा माऊलींचे सार्थ पसायदान पुस्तक, श्रीफळ आणि गुलाबपुष्प वृक्ष आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने भेट देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी आळंदी विकास मंचचे प्रमुख संदीप नाईकरे, सामाजिक कार्यकर्ते माऊली घुंडरे, खुशाल सुरवसे, गोविंद ठाकूर पाटील आदी उपस्थित होते. तत्पूर्वी भूमाता ब्रिगेड अध्यक्षा तृप्तीताई देसाई यांनी माऊली मंदिरात श्रींचे दर्शन घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!