आळंदी (अर्जुन मेदनकर) – येथील तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये लग्न समारंभ, रविवारी सुट्टीचा वार असल्याने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात भाविकांची दर्शनास गर्दी झाल्याने भाविक, लग्न व-हाडी यांचे वाहनांमुळे महावाहतूक कोंडी नगरप्रदक्षिणा मार्गावर झाली. यात बेशिस्त वाहन चालकांच्या वाहने पुढे नेण्याचे प्रयत्नात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यात भाविकांची, नागरिकांची पादचारी यांची गैरसोय झाली. वाहतूक पोलिसांनी परिश्रमपूर्वक वाहतूक कोंडी दूर करण्यास परिश्रम घेतले. यात आळंदी वाहतूक पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यास काम पाहिले. भैरवनाथ चौक, प्रदक्षिणा मार्ग, इंद्रायणी नदीवरील पुल, चाकण चौक आदी ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीने भाविकांत तीव्र नाराजी पसरली होती.
——————-