दोहा (कतार) – शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने पेनाल्टी शूटआऊटवर ४ – २ असा विजय मिळवत तब्बल ३६ वर्षांनी वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने पेनाल्टी शूटआऊटवर ४ – २ असा विजय मिळवत इतिहास घडविला. अर्जेंटिनाने पहिल्या हाफमध्येच दोन गोल करत आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर एम्बाप्पेने एका मिनिटात दोन गोल करत सामना बरोबरीत आणला. एक्स्ट्रा टाईममध्ये देखील मेस्सीने अर्जेंटिनाला १०८ व्या मिनिटाला आघाडी घेतली. मात्र अर्जेंटिनाची एक चूक महागात पडली अन् ११८ व्या मिनिटाला एम्बाप्पेने पेनाल्टीवर हॅट्ट्रिकवाला गोल करत सामना पेनाल्टी शूटआऊटवर नेला. मात्र पेनाल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने सरस खेळ करत ४ – २ असा विजय मिळवला.
अर्जेंटिनाचे दिवंगत स्टार फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांनी अर्जेंटिनाला १९८६ मध्ये वर्ल्डकप जिंकून दिला होता. त्यानंतर जवळपास ३६ वर्षे अर्जेंटिनाला वर्ल्डकपने हुलकावणी दिली होती. मात्र अखेर ३६ वर्षांनी हा सुवर्णयोग आलाच आणि लिओनेल मेस्सीचे एक वर्तुळ देखील पूर्ण झाले. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या नावपुढे विश्वविजेत्याचा टॅग लागला. लिओनेल मेस्सीचं त्याच्या कारकिर्दीतील अखेरची फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. अर्जेंटिनाची टीम फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचा २०२२ चा विजेता बनली आहे. मेस्सीनं मुख्य मॅच आणि एक्स्ट्रा टाइममध्ये २ गोल केले. त्यामुळं सामना अतिरिक्त वेळापर्यंत ३-३ अशा बरोबरीत सुटला होता. अखेर पेनल्टी शुट आऊटमध्ये अर्जेंटिनानं ४-२ असा विजय मिलवला. लुसैल स्टेडियममधील मॅच रोमांचक ठरली.