साेलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – आयुष्यातील सर्वात महत्वाच्या असलेल्या संस्कारापैकीचा एक विवाह सोहळा पार पाडून बुध्दराष्ट्र प्रतिष्ठानने गरीबांचा संसार थाटला. या सामुदायिक विवाह सोहळ्यात पाच जोडप्यांनी रेशीमगाठी बांधून नव्या जीवनाची सुरुवात केली.
बुध्दराजा मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था संंचलित बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान शेजारी बुद्धराष्ट्र चौकात विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास विवाह सोहळ्यास सुरुवात झाली. बौद्धाचार्य विशाल गायकवाड यांनी त्रिशरण पंचशील घेऊन नववधूवरांना आयुष्याच्या संसाराची प्रतिज्ञा दिली. बौध्द धम्म पध्दतीने विवाहाचे संस्कार करून शेवटी फुलांचा वर्षाव करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या कडकडात मोठ्या थाटात विवाह सोहळा पार पडला. बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अजित गादेकर यांनी सर्व मान्यवरांचे व वऱ्हाडी मंडळीचे स्वागत केले. वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा सोलापूर शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख, नगरसेवक संजय कोळी, राजकुमार पाटील, जोडभावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, महादेव बाबरे, डि.के. ग्रुपचे दशरथ कसबे, बॉबी गुप चे अजित गायकवाड आयडल्स गुप चे कुणाल बाबरे , नगरसेवक प्रा. नारायण बनसोडे, केदार उंबरजे, राजाभाऊ माने, महादेव कोगनुरे नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेविका आश्विनी चव्हाण, निर्मला ओझा, रमेश होटकर पोलीस नाईक शीतल शिवशरण, के. डि .कांबळे चंद्रकांत निंबर्गीकर, बाळासाहेब गायकवाड, विकी शेंडगे, बाळासाहेब थोरात, पिंटु ढावरे, डॉ. सचिन कांबळे, मारुती बिराजदार यांच्यासह रमाबाई आंबेडकर नगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संयोजक संजय बनसोडे, प्रमोद चंदनशिवे, अमोल सोनवणे, आकाश कांबळे,मल्लिनाथ रामशेट्टी, गजानन होटकर,नितीन गादेकर, शांत साबळे, विजय गादेकर, उत्सव अध्यक्ष विशाल कांबळे, अमोल शिंदे महाराज वाघमोडे, निलेश गादेकर, सुदर्शन कांबळे, अजय लोंढे, संजू बनसोडे, विशाल चंदनशिवे, रोहन गायकवाड, सोहन शिवशरण, मल्लेश घागरे, आप्पा कांबळे, आदित्य कांबळे, विशाल चंदनशिवे, सुरज कांबळे, दत्ता थोरात ,मिलिंद कांबळे ,भैय्या चौधरी,अजिंक्य कांबळे, मनोज जाधव, रोहन जाधव, आदित्य चंदनशिवे, दादू गंदले, भोला सोनकांबळे यांच्यासह सर्व सभासद पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
……….