साेलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे प्रशिक्षणासाठी जात असल्याने त्यांच्याकडे असलेला पदभार सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे यांचेकडे दिला आहे. आवाळे यांच्या स्वागतासाठी त्यांच्या दालनात शाल व पुष्पगुच्छ घेऊन भेटीसाठी गर्दी पाहायला मिळाली. सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन करून त्यांनी विभाग प्रमुखांची ओळख करून दिली. नूतन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी सीईओ दिलीप स्वामी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, शिक्षणाधिकारी संजय जावीर, प्रकल्प अधिकारी जावेद शेख, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक कोळी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रभारी प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, उमेदचे अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, प्रमुख उपस्थित होते. या प्रसंगी उपशिक्षणाधिकारी सुधा साळुंखे अधिक उपस्थित होते.
विभागप्रमुख धास्तावले
जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शुक्रवारी मनीषा आव्हाळे यांनी पदभार स्वीकारला. हा पदभार स्वीकारताच जिल्हा परिषदेमधील असलेल्या विभाग प्रमुखांनी आवळे यांची त्वरित भेट घेतली. तसेच काही विभागप्रमुखांनी धास्ती देखील घेतली असल्याचे बोलले जात आहे.
………….