साेलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – राज्यातील १२ हजार १४५ ग्रंथालयात २१ हजार ६१५ कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर काम करतात. सध्या पुस्तके, मासिक व वृत्तपत्रे यांच्या वाढत्या किमतीमुळे व मागील दहा वर्षांपासून अनुदानात वाढ झाली नसल्यामुळे २५ जून २०१९ रोजी तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळात घोषणा केलेल्या ६०%अनुदानाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ पुणे विभागाचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी सांगितले. या निर्णयामुळे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांचा सदाशिव बेडगे यांनी पेढे भरवून तोंड गोड केले.
ग्रंथालय अनुदानात वाढ झाली पाहिजे हे सातत्याने मंत्री महोदया बरोबर, उपसचिव उच्च व तंत्रशिक्षण मंत्री अर्थमंत्री यांच्या बरोबर चर्चा करून शासनानाला अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेण्यासाठी सदैव मंत्रालयात जावून प्रयत्न केले. यावेळी प्रदीप गाडे, यल्लाप्पा घोडके, तिप्पणा गणेरी, सिध्दाराम हलकुडे, गिरीश मठपती, आरीफ रंगरेज, कुमार चन्ना, धोंडिराम जेवूरकर आदी उपस्थित होते़. उशीरा होईना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ग्रंथालय चळवळ वाढीस प्रोत्साहन दिले.