Cinema

‘पठाण’मधील ‘बेशरम रंग’ने दुखविल्या हिंदूंच्या भावना!

मुंबई (प्रतिनिधी) – शाहरूख खान व दीपिका पदुकोनचा बहुचर्चित ‘पठाण’ हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर, त्यातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकीनी घातली असून, ती शाहरूख खानसोबत अश्लील हावभाव करताना दिसते आहे. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, सोशल मीडियावर बायकॉट पठाण हा ट्रेड चर्चेत आला आहे. तर, अनेकांनी दीपिकाच काय पण, या अगोदर इतरही हिरोईन्सने भगवी बिकिनी घालून आपले अंगप्रदर्शन केले आहे, असे दावा करत या ट्रेडला विरोधही चालवला असल्याचे दिसते आहे.

मग अक्षय कुमार कसा चालताे?

एकीकडे शाहरुख आणि दीपिकाचे ‘पठाण’मधील ‘बेशरम रंग’ हे गाणे इंटरनेटवर व्हायरल होत आहे, तर दुसरीकडे या गाण्यावर बंदी घालण्याचीही मागणी होत आहे. या गाण्यात दीपिका अतिशय बोल्ड लूकमध्ये आहे. तिने एकेठिकाणी भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. त्यावरूनच सगळा वाद सुरू झाला. सोमवारी (१२ डिसेंबर) या सिनेमातले ‘बेशरम रंग’ हे गाणे रिलीज झाले. त्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा शाहरुखला ट्रोल करण्यास सुरुवात झाली. केवळ शाहरुख खानच नाही, तर दीपिका पदुकोणलाही सोशल मीडिया युजर्सने ट्रोल केले आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील तगडा अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाणवर’ बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड जोरात सुरू झाला असून, विशेष म्हणजे आमिर खानचा लाल सिंह चड्ढा रिलीज झाल्यानंतरही सोशल मीडियावर चित्रपटावर बहिष्कार सुरूच आहे. अशा परिस्थितीत आता बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा पठाण या समीक्षकांच्या निशाण्यावर आला असून, त्याअंतर्गत चित्रपटावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात झाली आहे. त्यात ‘बेशरम रंग’ हे दीपिका-शाहरुखचे बोल्ड गाणे प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाला होणारा विरोध वाढला. या गाण्यामध्ये दीपिका-शाहरुखने इंटिमेट डान्स केला आहे, आणि दीपिकाचा बोल्ड अंदाजही पाहायला मिळाला. नेटकर्‍यांना हे रुचले नसून यानंतर त्यांनी ट्रोलिंगला सुरुवात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!