– जिल्ह्याचे खासदार स्वतः रस्त्यावर उतरले!
उस्मानाबाद (विठ्ठल चिकुंद्रे) – २०२० खरीप हंगामाचे उर्वरित ३३१ कोटी, २०२१ चे ३८८ कोटी विमा कंपनीने शेतकर्यांच्या खात्यात जमा करावे, सप्टेंबर महिण्यातील नुकसानभरपाई अनुदान २४८ कोटी ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागण्यांसाठी उपोषणास बसलेले धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांना पाठिंबा देत, उस्मानाबाद जिल्हातील सारोळा येथील सात शेतकरी आंदोलक तब्बल सहा तास खड्ड्यात बसले व तीव्र आंदोलन केले. तहसीलदार गणेश माळी त्यांना आश्वासन दिल्यानंतर हे शेतकरी बाहेर आले आहेत. पैसे न जमा झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा त्यांनी दिला आहे.
२०२०सालच्या पीक विम्याचा बाबतीत कंपनीने पीक विम्याची नुकसान भरपाई घायला नकार दिला. खासदार ओमराजे निंबाळकर यांना रस्तावर उतरुन आंदोलन करावे लागले. शेतकरांच्या पीकविमा आणि अनुदानाची पैसे मिळावे, या मागणीसाठी आता शेतकरी आंदोलन पेटताना दिसत आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस असून खासदार स्वतः रस्तावर उतरले आहेत. सोलापूर- औरंगाबाद रस्तावर चक्काजाम केला गेला. शिवसैनिकांनी रस्ता रोको आंदोलन केले. २०२० सालच्या पीक विम्याचा बाबतीत कंपनीने पीक विम्यांचे नुकसान भरपाई घ्यायला नकार दिला असून, त्याविरोधात १० जून २०२१ला शिवसेना ही औरंगाबाद उच्च न्यायालयात गेली. खंडपीठाने नुकसान झाल्यांचे सांगितले असून, ४० टक्के नुकसान झाले असे गृहीत धरुन प्रती हेक्टरी १८ हजार रुपये नुकसान भरपाई विमा कंपनीने द्यावी, असा आदेश दिला, अशी माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयानेदेखील हा आदेश कायम ठेवल्याने तीन आठवड्यात हे पैसे जमा करावेत, असा आदेश होता. ५३२ कोटी रुपयाची विम्याची रक्कम होते. २०० कोटी रु.दिले म्हणून सांगितले जाते. पण अघाप ही रक्कम जिल्हाधिकारी यांच्या खात्यात जमा झाली नाही तर मग शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमाच झाले नाहीत, शेतकर्यांची दिवाळी अंधारात गेल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले.