AalandiPachhim Maharashtra

महाराष्ट्राला अलौकिक संत परंपरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : महाराष्ट्राला अलौकिक संत परंपरा लाभली आहे. वारकरी परंपरेत एक शक्ती आहे. ताकत आहे. यात भक्ती आणि ज्ञान आराधना आहे. भजन कीर्तनात ओव्या, भारूड यातून सर्व सामन्यांना सार समजेल असे सांगितले जाते. येथील मृदंग ज्ञान शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्त्सव, गुरु पूजन ,पखवाज वादन या आगळ्या वेगळ्या सोहळ्यात येण्याचा योग्य आला. आपले भारतीय संस्कृतीत मोठे आदराचे स्थान आहे. यात आई, वडील आणि गुरु माऊली यांना आदराचे स्थान आहे. या संस्थेचे प्रमुख दासोपंत स्वामी महाराज यांना मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करीत असल्याचे गौरवोदगार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले.

आळंदी येथील मृदंग ज्ञान शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचा रौप्य महोत्सव, गुरुपूजन, मृदंग वादन, मानपत्र अर्पण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या प्रसंगी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, खासदार श्रींरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार महेंद्र थोरवे, तहसीलदार वैशाली वाघमारे, मृदंग ज्ञान शिक्षण संस्थेचे प्रमुख पंडित दासोपंत महाराज स्वामी उंडाळकर, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक शांतिब्रम्ह मारुती महाराज कुरेकर, पुरुषोत्तम महाराज पाटील, तुकाराम महाराज ताजने, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस उपायुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, शहाजी पवार, ज्ञानेश्वर साबळे यांचेसह हजारावर मृदंग वादक, वारकरी विद्यार्धी, साधक उपस्थित होते. या सोहळ्यात पंडित दासोपंत स्वामी महाराज उंडाळकर यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मारुती महाराज यांचे हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिमा, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मृदंग ज्ञान शिक्षण संस्थेच्या कार्याचे कौतुक मुख्यमंत्री यांनी केले. मारुती महाराज कुरेकर यांनी यावेळी कृपाशिर्वाद देत कार्यक्रमास सद्दिच्छा दिल्या.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्रा ला महान वारकरी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रास अलौकिक संत परंपरा लाभली आहे. आपण सर्व भाग्यवान आहोत. महाराष्ट्राचे वेगळे स्थान आहे. वारकरी संप्रदायात मोठी शक्ती, ताकद आहे. भक्ती आणि ज्ञान आराधना आहे. विश्वशांती आणि मानव कल्याणाचा यात विचार केला जातो. सर्व सामान्य माणसांना याचे सार कीर्तन प्रवचनाचे माध्यमातून दिले जाते. अखंड हरिनाम सप्ताह, पांडुरंगाचे नामस्मरण केले जाते. यातून मनात राग, लोभ, मद, मत्सर दूर होतो. ते म्हणाले, लोकांचे हिताला प्राधान्य देण्याची स्पर्धा असावी. मला काही मिळवायचे म्हणनू स्पर्धा नसावी. राज्यात सर्व जनतेच्या हितासाठी गेल्या तीन महिन्या पूर्वी कार्यक्रम केला. यावेळी एकच जल्लोष झाला. आषाढी एकादशीची पूजा करण्याची संधी मिळाली तो दिवस आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस असल्याचे सांगितले. बाहेर पडलो. चांगले वाईट विचाराचे लोक असतात. मात्र आपण आपले काम चांगले काम करायचे असते. पांडुरंगाला चांगले कार्याची चिंता आहे. सर्व सामान्यांच्या हिताचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री पद हे सर्व समाजासाठी आहे. सगळे शेतकरी, वारकरी ,कामगार, कष्टकरी यांच्या कल्याणासाठी या पदाचा वापर करायचा आहे. यातूनच तीर्थक्षेत्र पंढरपूरचा विशेष कृती आराखडा करण्याचे सूचना दिल्या आहेत. वारकरी, भाविक यांना तीर्थक्षेत्रात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा देण्याचे कार्य केले जात आहे. येथे ही अर्थात आळंदी देहू मध्ये ही वारकरी, भाविक यांना सोयी सुविधा दिल्या जातील अशी ग्वाही दिली. आळंदी देहूत लाखो लोकांसाठी सेवा सुविधा देण्यासाठी विकास करायचा असल्याचे त्यांनी सांगितले. इंद्रायणी नदीचे विकास करण्याची मागणी उपस्थितांनी केली . यावर चांगल्या सूचनांचा देखील विचार करून विकास केला जाईल. असे सांगत इंद्रायणी नदी प्रदूषण, स्वच्छता या बाबत पुणे आयुक्त, जिल्हाधिकारी यांना सूचना देत असल्याचे सांगितले.

गेल्या २५ वर्षांपासून येथे मृदंग वादनाचे धडे दिले जात आहेत. येथील शिक्षण घेऊन ते पुढे राज्याचे बाहेर देखील याचा प्रचार , प्रसार केला जात असून हे कार्य गौरवास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसाराचे काम येथून होत आहे. वारकरी आणि दिंडी परंपरा वैभवशाली आहेत. या वैभवात भर घालण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे.स्व. आनंद दिघे देखील आम्हाला कीर्तन, प्रवचन कार्यक्रमात अखंड हरिनाम सप्ताहात घेऊन जायचे अशी आठवण त्यांनी सांगितले. सकारात्मक विचार आणि ऊर्जा अखंड हरिनाम सप्ताहातून मिळते. यातून समाज प्रबोधनाचे कार्य होते. वाईट विचार दुर करण्याचे मोठे कार्य महान वारकरी संप्रदायाचे माध्यमातून होत आहे. यावेळी पाहावा विठ्ठल पुस्तक प्रकाशनाची आठवण करून त्यांनी दिली. यावेळी स्व.आनंद दिघे आणि स्व, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा उपस्थितांनी देत जोश वाढविला. प्रास्ताविक पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केले. मृदं वादनाचे कार्यक्रमास उपस्थितांनी मोठी दाद दिली. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदी येथील माऊलींचे मंदिरात जात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले. आळंदी देवस्थानचे वतीने विश्वस्त ऍड विकास धागे पाटील, विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख यांनी देवस्थानचे वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सत्कार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आळंदी दौर्यात विविध पक्ष संघटनांनी विविध विविध विकास कंची निवेदने देत संवाद साधला. यात अण्णासाहेब हजारे प्रेरित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे जिल्हा संघटक पै बाळासाहेब चौधरी, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संहलक राम गावडे. लोकशाहीर आणाभाऊ साठे स्मारक फाउंडेशनचे सचिव सूर्यकांत खुडे, दिव्यांग संघटनेच्या खेड तालुकाध्यक्षा अर्चना घुंडरे, आळंदी विकास मंचाचे प्रमुख संदीप नाईकरे पाटील आदींनी निवेदने देऊन येथील विकास कामना गती देण्याची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!