पाचोड/विजय चिडे
पतीचा मानसिक छळ करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून दाभरुळ तांडा ता.पैठण येथील एका चोवीस वर्षीय युवकांने दि.१३ जून रोजी जामखेड ता.अंबड शिवारात जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. या प्रकरणी पत्नी रोशनी राठोड, नंदू चव्हाण व त्यांची पत्नी, मामा संतोष राठोड व त्यांची आई या पाच जणांना विरूध्द पाचोड पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला.
याविषयी पोलिस ठाण्यांत मयताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले की, दाभरूळ तांडा ता.पैठण येथील मोहन गोरख राठोड (वय२४) वर्ष याचे दोन वर्षांपूर्वी देवगाव तांडा येथील नंदू चव्हाण यांची मुलगी रोशनी हिच्या सोबत विवाह झाला होता. विवाह झाल्यापासून ती केवळ एकच महिना सासरी व्यवस्थित नांदली.मात्र नंतर तीला संसार करायची इच्छा नव्हती त्यामूळे ती घरात सतत नवऱ्यासोबत वाद विवाद करायची व धमक्या देवुन घरातून माहेरी निघुन गेली होती. तीचा पती मोहन राठोड तीला आणण्यासाठी गेला असता त्यांच्या सासर कडील लोकांनी दोन तीन वेळा त्याला मारहाण केली होती.तेव्हा पासूनच पत्नी रोशनी राठोड हिच्यासह माहेरकडील वडील नंदू चव्हाण सह मामा संतोष राठोड आणि अन्य दोघांनी मिळून मोहनचा मानसिक छळ सुरू केला. त्यातच काही दिवसापासून रोशनी माहेरी निघून गेली होती.
तिला आणण्यासाठी गेलेल्या मोहनला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. या कारणामुळे त्याने जामखेड ता.अंबड शिवारात जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याबाबत त्याचे वडील गोरख धर्सिंग राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयितां विरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबाबत पाचोड पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुरेश माळी हे करीत आहेत.