पैठण : शिवनाथ दौंड
पैठण तालुक्यातील सर्वच शाळेतील पटसंख्येअभावी शाळांवर येणारे संकट बघता आता दुसऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पळवापळवी सुरू झाली आहे. परिसरातील शाळेने गेवराई मर्दा येथील आश्रम शाळेतील या वर्षी जवळपास 20 ते 30 विद्यार्थी शाळेने पळविल्याची माहिती समोर आली आहे. पालकांना पैशांचे प्रलोभन देऊन तसेच विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तके व स्कूलबस पुरवित हा प्रकार करण्यात आल्याची बाब पुढे येत आहे. याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारही नाही.
राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात खासगी शाळांना परवानगी दिल्यानेच असा प्रकार वाढत आहे. त्यातच शिक्षकांनाही अतिरिक्त ठरून घरी बसावे लागू नये यासाठी धावपळ करावी लागते आहे. उन्हाळ्याच्या सुटीत शिक्षक घरोघरी विद्यार्थी शोधत फिरत असल्याचे आता नवीन राहिलेले नाही. प्रत्येक शिक्षकांना किमान चार नवे विद्यार्थी शोधून आणलेच पाहिजेत, असे अनेक शिक्षण संस्थांनी शिक्षकांना बंधनकारक केले आहे. मात्र आश्रम शाळेला यात सूट कशी मिळाली यात मात्र शंका आहे.? शिक्षकांमध्ये गैरहजेरीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच दरवर्षी कमी होणारी पटसंख्या शिक्षकांसाठी डोकेदुखी कधीच ठरली नाही का.? ते न उकालणारे कोडे आहे.? गेवराई मर्दा येथील विद्यार्थी आडूळ ब्राम्हणगाव पारुंडी येथे शिक्षण घेत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. घरापासून 5 ते 10 कि.मी. परिसरात विद्यार्थ्यास शिक्षण मिळते, काही शिक्षणसंस्था असे प्रकार करीत आहेत. यातून शाळांचे चित्र बदलत आहे.
गेवराई मर्दा येथील संत एकनाथ आश्रम शाळा येथील उत्कृष्ट शाळांपैकी एक होती. अनेक उपक्रमांची सुरुवात अनेकदा याच शाळेतून होत होते. मात्र, आता या शाळेला गळती लागली आहे. या शाळेतील काही शिक्षकांनी काही महिन्यांपूर्वी गेवराई मर्दा येथील शाळेत अशी ही बनवाबनवी करीत म्हणून शिरकाव केला. मोठ्या मनाने या शाळेतील शिक्षकांनी त्यांना परवानगी दिली खरी मात्र, हाच मनाचा मोठेपणा शाळेचा अंगलट आहे. नंतर थापटी तांडा, आडूळ, शाळेतील काही शिक्षिका शाळेच्या बाहेर काही विद्यार्थ्यांशी बोलत असल्याचे शिक्षिकांना दिसले. त्यांनी यावर हरकत घेतली नाही. पण, तोवर वेळ निघून गेली आहे. या शाळेतील इयत्ता ,दुसरी, तिसरी, चौथी, सहावी आणि सातव्या वर्गातील किमान दोन वर्षात 40 ते 50 मुले शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र घेऊन गेल्याची विश्वसनीय माहिती आहे. संत एकनाथ आश्रम शाळेतील प्राथमिकच्या शिक्षिकांनी या संदर्भात मुख्याध्यापकमार्फत साधी लेखी तक्रारही शिक्षणाधिकाऱ्यास दिली नाही. हा खूप गंभीर प्रकार आहे.
स्कूलबसचेही आमिष
मुले शाळांपासून दुसऱ्या कोपऱ्यावर असले तरीही अनेक शाळा विद्यार्थ्यांची पळवापळवी करतात. यासाठी शिक्षणसंस्था शिक्षकांकडून पैसे घेतात. या पैशांतून स्कूलबस व गणवेश आदी खर्च करून आपल्या शैक्षणिक संस्था वाचविण्याचे प्रकार करतात. मात्र आश्रम शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांना कुंभकर्ण झोप लागली आहे.त्यामुळेच गेवराई मर्दा येथील विद्यार्थी आडूळ,ब्राम्हणगाव, थापटी तांडा, पारुंडी येथील शिक्षणसंस्थेत स्कूलबसने , सायकल ने रोज 10 कि.मी. दूर जाऊन शाळेत शिक्षण घेतात.
पालकांना पैसे; विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके
शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येक विद्यार्थ्यांमागे किमान ३ हजार रुपये देण्यात येते. शिवाय, विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तके देण्यात येतात. त्यामुळे ग्रामीण शाळेतील इतर इयत्तांमधील विद्यार्थी घेऊन जाण्याचे प्रकार घडत आहे. आश्रम शाळेतील विद्यार्थी पळविल्याचा घटनेपासून शालेय अध्यक्ष, कार्यकारी मंडळ अनभिज्ञ आहेत.