बुलडाणा – दहावीचा ऑनलाईन निकाल आज शुक्रवार 17 जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. यावेळीही मुलीच अमरावती विभागासह जिल्हयात अव्वल ठरणार का? सरासरी मागील तीनचार वर्षाच्या निकालाची आकडेवारी पाहता त्यामध्ये अमरावती विभागात मुलींचाच बोलाबाल असून बुलडाणा जिल्ह्यातही मुलीच प्रथमस्थानी होत्या. बुलडाणा जिल्ह्यात 39 हजार 502 विद्यार्थ्यांनी परिक्षेचे अर्ज भरले होते, त्यापैकी 38 हजार 473 नियमीत विद्यार्थ्यांनी तर 756 पुर्नपरीक्षार्थींनी अशा एकूण एकूण 39 हजार 229 विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील 518 परिक्षा केंद्रावर परिक्षा दिली होती. यावेळी बुलडाणा जिल्ह्याचा दहावीचा निकाल 98.80 टक्के लागणार असल्याचा अंदाज काही जाणकारांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ कडे बोलतांना व्यक्त केला आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
बुलडाणा तालुक्यातील 5494 विद्यार्थ्यांनी 69 परिक्षा केंद्रावरुन परिक्षा दिली. चिखली तालुक्यातील 4518 विद्यार्थ्यांनी 72 परिक्षा केंद्रावर, मेहकर तालुक्यातील 4444 विद्यार्थ्यांनी 48 परिक्षा केंद्रावर, लोणार तालुक्यातील 2354 विद्यार्थ्यांनी 33 परिक्षा केंद्रावर, देऊळगाव राजा तालुक्यातील 2236 विद्यार्थ्यांनी 27 परिक्षा केंद्रावर, सिंदखेड राजा तालुक्यातील 2852 विद्यार्थ्यांनी 45 परिक्षा केंद्रावर परिक्षा दिली होती. तर घाटाखालील मोताळा तालुक्यतील 1982 विद्यार्थ्यांनी 31 परिक्षा केंद्रावर, मलकापूर तालुक्यातील 2487 विद्यार्थ्यांनी 25 परिक्षा केंद्रावर, नांदुरा तालुक्यातील 2358 विद्यार्थ्यांनी 28 परिक्षा केंद्रावर, जळगाव जामोद तालक्यातील 2121 विद्यार्थ्यांनी 29 परिक्षा केंद्रावर, संग्रामपूर तालुक्यातील 1605 विद्यार्थ्यांनी 23 परिक्षा केंद्रावर , शेगाव तालुक्यातील 2469 विद्यार्थ्यांनी 29 परिक्षा केंद्रावर तर खामगाव खामगाव तालुक्यातील 4584 विद्यार्थ्यांनी 59 परिक्षा केंद्रावर परिक्षा दिली आहे. अश्याप्रकारे बुलडाणा जिल्ह्यातील एकूण 39 हजार 229 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली आहे. यामध्ये 17 हजार 294 विद्यार्थीनी तर 21179 अशा एकूण 38 हजार 473 विद्यार्थ्यांचा समावेश असून पुर्नपरिक्षार्थी विद्यार्थी 544 तर विद्यार्थीनी 212 असे एकूण 756 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली आहे. दुपारी 1 वाजेनंतर ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतरच समजेल अमरावती विभागात व बुलडाणा जिल्ह्यात मुली अव्वल राहतील की मुले बाजी मारतील.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
असा पाहा निकाल
स्टेप १) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
स्टेप २) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
स्टेप ४) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल..
पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल –
या संकेतस्थळावर आज शुक्रवार 17 जून रोजी दुपारी 1 ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.