ChikhaliCrime

स्वस्तात सोन्याच्या आमिषाने पालघरच्या हॉटेल चालकास वैरागड येथे लुबाडले!

- फोन करून बोलावले, म्हणे तुम्हाला सोन्याच्या गिण्या देतो; १५ लाखाला लावला चुना!

चिखली (रघुनाथ गवई) – जुने सोने सापडले असून, त्या सोन्याच्या गिण्या स्वस्तात देतो, असे सांगून पालघर येथील हॉटेल व्यावसायिकाला तब्बल १५ लाख रुपयांनी चुना लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उदयनगरनजीकच्या वैरागड येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी अमडापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

पालघर येथील गुरुनाथ शंकर दळवी यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे, त्यांना व त्यांचा भाचा उदय हरचंद घोलप यास तीन दिवसापूर्वी एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवरून फोन करून मी राजू कांबळे बोलतो व माझ्याजवळ मला जुने सापडलेले सोने आहे, ते कमी किमतीत देऊन विकायचे आहे. घ्यायचे असल्यास वैरागड येथे यावे. त्यानुसार, फिर्यादीसह त्यांचा भाचा हा २५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता वैरागड येथे गेले. उदय घोलप यांनी त्या मोबाईल नंबरवर फोन करून आम्ही आलो असे सांगतच, राजू कांबळे व अजून एकाने आम्हाला खामगाव रोडवरील सह्याद्री हॉटेल जवळच्या महादेवाच्या मंदिरामागे एका शेतात नेले, आणि त्याच्याजवळ असलेल्या जुन्या सोन्याच्या दीड किलो गिण्या या ३० लाख रुपयात विकायचा आहे असे सांगितले. तेव्हा त्यांनी थैलीतून एक गिणी काढत अंदाजे एक किलोग्रॅम वजणाची सोनाराकडून खात्री करून घेण्यासाठी दिली. त्यावेळेस सोबत असलेले राजेश दळवी यांनी राजू कांबळे यांना तुम्ही आमच्या सोबत चला सोनाराकडे खात्री पटल्यानंतर तुम्हाला पैसे देतो म्हणून सांगितले, तेव्हा आम्ही येऊ शकत नाही असेच सांगितले. तेव्हा राजेश दळवी यांच्याकडे असलेल्या पीएम मेटल डिटेक्टर मशीनने सदर सोन्याचे घेणे असल्याचे दर्शवले त्यावर सोने असल्याचा विश्वास पटल्याने उद्या पंधरा लाख घेऊन येतो असे आम्ही सांगितले. हे सर्वजण परत पालघर येथे गेले. दुसर्‍या दिवशी २६ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे आठ वाजता परत वैरागड येथे महादेव मंदिराजवळ येऊन उदयने राजू कांबळे यास फोन करून आम्ही सोन्याच्या गिण्या विकत घेण्यासाठी पंधरा लाख रुपये घेऊन आलो असल्याचे सांगितले. काही वेळानंतर राजू कांबळे हा त्याच्यासोबत साठ वर्षे वयाचा व दुसरा पन्नास वर्षे वयाचा ठेंगणा गोर्‍या रंग असा वर्णाचा अशा दोन्ही इसमासह आमच्याकडे आला व त्याच्या जवळील काळ्या पिशवीतील पिवळ्या रंगाच्या धातूच्या गिण्या आम्हाला दाखवल्या. त्यामध्ये गिणी तपासण्यासाठी देणे परत तपासून ह्या असे म्हणत, तिघांनी परत मशीनवर तपासणी केली व ते गिरणी परत घेऊन त्याने तिच्यामध्ये टाकले आणि आमचे खात्री पडल्याने आम्ही त्यांना १५ लाख रुपये देऊन दीड किलो सोन्याच्या गिण्या विकत घेतल्या. आम्ही परत पीएमआय मेटल डिटेक्टर मशीनमध्ये उर्वरित धातूच्या गिण्याचे तपासणी करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्या गिरण्या सोन्याच्या नसल्याचे दर्शवले. तेव्हा आम्ही राजू कांबळे व त्यांचे दोन सहकार्‍यांना आवाज देऊन बोलावले असता, ते सर्वजण गडबडीमध्ये जंगलाच्या दिशेने पळून गेले. तेव्हा आमच्या लक्षात आले की राजू कांबळे व त्याच्या दोन सहकार्‍यांनी आम्हाला खोटे सोने दाखवून आमचे फसवणूक केली आहे. या संबंधित राजू कांबळे व त्याच्या सहकार्‍यांनी फसवल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून अमडापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास अमडापूर पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!