ChikhaliHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

चिखली मतदारसंघाचा आणखी विकास साधण्यासाठी श्वेताताईंना पुन्हा संधी द्या : प्रकाश महाराज जवंजाळ

- भरोसा भोरसी, पाटोदा, पेन सावंगी, नायगाव बुद्रुक व नायगाव खुर्द येथे भेटीगाठी दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद

चिखली (रघुनाथ गवई) : मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपा – शिवसेना युतीच्या बाजूने कौल दिल्यानंतरही ज्या घडामोडी घडल्या, त्यामुळे महाराष्ट्राचे व आपल्या चिखली मतदारसंघाचे अतोनात नुकसान झाले. परंतु, दोन वर्षांपूर्वी महायुतीची सत्ता आल्यानंतर आ. श्वेताताई महाले यांनी चिखली मतदारसंघात हजारो कोटी रुपयांचा निधी खेचून आणत जो काही अभूतपूर्व विकास केला, त्यामुळे चिखली मतदारसंघाचे रुप पालटायला सुरुवात झाली आहे. या विकासाची गती अधिक वाढवण्यासाठी पुन्हा एकदा श्वेताताईंनाच आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या. आपल्याला नक्कीच अधिकारी विकासकामे झालेली दिसतील, असे उद्गार भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ यांनी काढले. दि. २६ ऑक्टोबर रोजी आ. श्वेताताई महाले यांच्या प्रचारार्थ आयोजित भेटीगाठी दौऱ्यादरम्यान ते बोलत होते.

महायुतीच्यावतीने चिखली मतदारसंघात भाजपाच्या अधिकृत उमेदवार म्हणून आ. श्वेताताई महाले यांच्या नावाची घोषणा झाली आहे. दि. २८ ऑक्टोबर रोजी त्या आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. तत्पूर्वी आ. महाले यांनी मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागात भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. २६ ऑक्टोबर रोजी भोरसा भोरसी, पाटोदा, पेन सावंगी, नायगाव खुर्द आणि नायगाव बुद्रुक या गावांना आ. श्वेताताई महाले यांनी भेटी देऊन थेट मतदारांशी संपर्क साधला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ व जिल्हा सचिव कृष्णकुमार सपकाळ हे उपस्थित होते. आपल्या भेटीसाठी दौऱ्या दरम्यान श्वेताताई महाले यांनी प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, महिला, युवक, शेतकरी, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक आदी विविध समाज घटकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. ग्रामीण भागातील मतदारांकडून देखील श्रीमती महाले यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.
भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ हे वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत. ग्रामीण भागात त्यांचा खूप मोठा प्रभाव असल्याने या दौऱ्यात ठिकठिकाणी जमलेल्या ग्रामीण भागातील गावकरी आणि महिलांशी त्यांची पटकन नाळ जुळते. जवंजाळ यांनी देखील उपस्थितांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधून महायुती सरकारच्या योजना व श्वेताताईंनी केलेल्या कामाची प्रभावीपणे माहिती दिली. महिलांना एसटी भांड्यात ५० टक्के सवलत, मुलींच्या उच्च शिक्षणाची मोफत व्यवस्था, कामगार कल्याण मंडळामार्फत संसार उपयोगी भांड्यांच्या किटचे वितरण, मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना या सर्व योजना महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केल्या असून, आ. श्वेताताई महाले यांनी प्रभावी व पारदर्शकपणे या योजनांची अंमलबजावणी चिखली मतदारसंघात केल्याचे जावंजाळ म्हणाले. काँग्रेसच्या काळात घरकुल योजना पूर्णपणे दुर्लक्ष झाली होती. परंतु महायुती सरकारच्या प्रत्येक घरकुल योजनेतून प्रत्येक गावातील प्रत्येक समाज घटकाला श्वेताताईंनी हक्काचा निवारा मिळवून दिल्याचे ते म्हणाले.
या भेटीगाठी दौऱ्यात जागोजागी प्रत्येक गावात श्वेताताईंचे उत्स्फूर्त स्वागत झाले. स्थानिक गावकऱ्यांनी श्वेताताईंना भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यांनी केलेल्या विकासकामांची उजळणी लोकांनीच करून दिली ही विशेष गोष्ट प्रकर्षाने जाणवली. प्रत्येक ठिकाणी आ. श्वेताताई महाले यांचे प्रयत्न व पाठपुराव्यातून तयार झालेले अंतर्गत रस्ते असो जोड रस्ते असो पांधण रस्ते असो किंवा वेगवेगळ्या योजनांमधून गावकऱ्यांना मिळालेली घरकुल असो जलजीवन मिशनद्वारे सोडवलेली पाणी समस्या असो या प्रत्येक गोष्टीची जाणीव गावातील बहुसंख्य नागरिकांना असल्याचे चित्र पाहायला मिळाले. स्थानिक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या भाषणातून श्वेताताईंनी केलेल्या या मूलभूत कामांचा उल्लेख होत असल्याने झाल्याने या गोष्टी लक्षात ठेवूनच श्वेताताईंना ग्रामीण भागातून भरभरून मतदान मिळेल याची खात्री पटली. उदाहरणच द्यायचे झाले तर नायगाव खुर्द येथील सरपंच गंगाताई जवंजाळ यांनी श्वेताताईंनी गावाला केलेल्या सर्व प्रकारच्या सहकार्याचा उल्लेख केल्यानंतर उपस्थित महिला व पुरुष गावकऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाट श्वेताताईंच्या प्रयत्नांना दाद दिली.
या दौऱ्यात सरपंच प्रदीप सोळंकी, गजानन सोळंकी, बद्री पानगोळे, अनमोल ढोरे, रमेश अकाळ, विकास मोरे, नंदकिशोर गुंजकर, सुधाकर मोरे, उदव महाराज जवजाळ, नारायण शेजोळ , गणेश शेजोळ यांच्यासह ठिकठिकाणीच्या भाजप आणि महायुतीचे पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, आजी – माजी सरपंच, आजी – माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच कार्यकर्ते, समर्थक व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!