जालना (जिल्हा प्रतिनिधी) – पतसंस्थेला झालेला नफा हा लाभांश स्वरुपात न घेता, त्याचे भागभांडवलामध्ये रुपांतर केले तर पतसंस्था आर्थिकदृष्ट्या प्रबळ होते. सभासदांनी या बाबत विचार करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक परमेश्वर वरखेडे यांनी केले. जालना जिल्हा अशासकीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे चेअरमन विलासराव वायाळ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यावेळी उद्घाटक म्हणून जिल्हा उपनिबंधक परमेश्वर वरखडे हे उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा वेतन पथक अधीक्षक सुनिल पोलास, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बन्सीराव कर्हाड, माजी अध्यक्ष तथा संचालक जयंतराव चव्हाण, उद्धवराव म्हस्के, माजी सचिव अशोक खरात, ज्ञानेश्वर टेकाळे, दिलीप जोगदंड, पतसंस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष विजय उबरहंडे, सचिव राजेंद्र देव्हडे, पंच सुनिल प्रभाकरराव खेडेकर हे होते.
याप्रसंगी बोलताना जिल्हा उपनिबंधक श्री वरखडे यांनी सभासदांना संबोधित करताना सांगितले की, पतसंस्थेला झालेला नफा हा लाभांश रुपात न घेता भागभांडवलमध्ये रूपांतर केला तर पतसंस्था आर्थिकदृष्टीने प्रबळ होईल. पतसंस्थेचे आजचे काम प्रगती पथावर आहे, असेही त्यांनी कौतुक केले. विद्यमान अध्यक्ष विलास वायाळ यांनी अध्यक्षीय समारोप करताना पतसंस्थेचा आर्थिक लेखाजोखा मांडला. सभासदांना सांगितले की, संचालक मंडळीने खर्च कमी करून नफा वाढवला, तेव्हा ठेवी ठेवा असे आवाहन केलें. यावेळी माजी चेअरमन बन्सीराव कर्हाड जयंतराव चव्हाण, उद्धवराव म्हस्के, माजी सचिव अशोक खरात यांनीदेखील मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. सभेचे भारदस्त संचलन संचालक साजिद पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक संदीप डोईफोडे यांनी केले. सभा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संचालक शांतीराम तौर, बाळासाहेब ठाकरे, बालासाहेब आबुज, प्रभाकर मोहिते, परमेश्वर लहाने, संचालिका संध्याताई देशमुख, छायाताई वरगणे व व्यवस्थापक सुनिल बोरुडे, कनिष्ठ लिपिक बाबासाहेब शेरकर आदींनी प्रयत्न केले.