MarathwadaPAITHAN

गेवराई मर्दा येथे लहान मुलांचा अर्धवार्षिक वाढदिवस साजरा

पैठण (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील गेवराई मर्दा येथे एकत्मिक बालविकास सेवा योजना पैठण प्रकल्प क्रमांक १ गेवराई मर्दा व तांडा येथे अर्धवार्षिक वाढदिवसाचा आगळा वेगळा कार्यक्रम अंगणवाडी सेविका यांनी साजरा केला व बाल्यावस्था गरोदरपणामध्ये स्त्रियांस व जन्मानंतर बालकांस पहिल्या दोन वर्षात योग्य आहार न मिळाल्यास त्याचे दूरगामी परिणाम हे शारीरिक, मानसिक व बौध्दिक विकासावर होऊन, लहान वयात (दोन वर्षाच्या आतील) कुपोषणामुळे कमी प्रतिकारशक्ती, कमी बुध्यांक, कमी एकाग्रता, कमी उंची, कमी शारीरिक वाढ, कमजोरपणा, कमी उत्पादकता, कौशल्याची कमतरता, समजण्याची कमी क्षमता, स्नायुंची कमजोरी असे विपरित परिणाम आढळून येतात, असे मार्गदर्शन अंगणवाडी सेविका मीरा खेडकर यांनी आज, सोमवारी गेवराई मर्दा येथे केले.

येथील अंगणवाड़ीमध्ये लहान बालकाचा अर्धवार्षिक वाढदिवस साजरा करण्यात आला, या प्रसंगी त्या बोलत होत्या.पुढे त्या म्हणाल्या की, भारतातील बर्‍याच भागात कित्येक ठिकाणी पिढ्यानपिढ्या उपयुक्त वेळेस मुलांना योग्य आहार न मिळाल्यामुळे अशाच प्रकारचे परिणाम सर्वसाधारण लोकांमध्ये दिसतात. जसे की सर्वसाधारण उंची पांच फुटापेक्षा कमी असणे, गरोदर मातांची उंची कमी असल्यामुळे धोकादायक बाळंतपणे होणे, मोठ्या संख्येने कमी वजनाची मुले जन्माला येणे, शाळेत शिकण्यास अडचणी इत्यादी समस्या वर महिलांना मार्गदर्शन करून, संस्कार दौंड याचा अर्धवार्षिक वाढदिवस अंगणवाडी गेवराई मर्दा येथे मीरा खेडकर यांनी गावातील मातांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, सहा महिन्याच्या वरील बालकांना आईच्या दुधा सोबत वरचा पुरक पोषण आहार देण्यास सुरुवात करणे, आहारामध्ये तांदळाची खीर, मुग, तांदुळ खिचडी, भाज्यांचे सूप, फळांचे ज्यूस सर्व अन्न घटकांचा समावेश करणे आदिविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अंगणवाडी सेविका मीराताई खेडकर, मदतनीस छगाबाई जायभाये, संस्कार या मुलाची आई मनीषा शिवनाथ दौंड, कबुबाई ढाकणे, वच्छलाबाई ढाकणे आदिसह बालकांच्या माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

परिसरातील अंगणवाड़ीमध्ये प्रथमच असा अनोखा अर्ध वार्षिक वाढदिवस साजरा करण्यात आल्याने याची सर्वत्र मोठी चर्चा होत आहे, अशी प्रतिक्रिया कडेठाण खुर्दच्या उपसरपंच सौ. सुरेखा अंकुश राठोड यांनी दिली आहे.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!