बुलडाणा- (जिल्हा प्रतिनिधी) मोताळा शहरामध्ये आठवडी बाजारातील सुरेश सदाणी यांच्या कृषीकेंद्राचे ६ जूनच्या रात्री चोरट्यांना गोडावून फोडून दुकानातील कापूस बियाणे, सोयाबीन व इतर बियाणे असा एकूण ३ लक्ष ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. बोराखेडी पोस्टे.अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरी प्रकरणात मलकापूर येथून एका अट्टल घरफोड्यास बोराखेडी पोलिसांनी १२ जूनच्या रात्री मुद्देमालासह गजाआड केले, त्याला अट्टल चोरट्यास आज १३ जून रोजी मोताळा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनाविली आहे. तर या चोरी प्रकरणातील चार आरोपी मात्र अद्यापही फरारच आहे.
मोताळा येथील सुरेश सदाणी यांच्या कृषी केंद्रामधून ऐन पेरणीच्यावेळी बि-बियाण्यांचे गोडावून फोडून मोठ्या प्रमाणात माल चोरट्यांनी चोरुन नेला होता. या चोरट्यांना पकडणे बोराखेडी पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. याबाबत पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी तपास अधिकारी म्हणून सपोनी.विकास पाटील यांना नियुक्त करुन विशेष पोलिस पथकाची नेमणूक केली होती. त्या पथकातील पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सीसीटीव्हीचे फुटेजच्या आधारे सुतावरुन गुन्ह्याचा शोध लावला आहे. तसेच गुन्ह्यातील बि-बियाणे कोण विक्री करीत आहे, याची सखोल माहिती काढून मलकापूरमध्ये सराईत गुन्हेगार मुख्य आरोपी शे. साबीर शे.अहमद (वय २८) सायकलपूरा मलकापूर या रेकार्डवरील सराईत अट्टल गुन्हेगारास मोठ्या शिताफीने ताब्यात घेवून चोरी गेलेल्या मालाबाबत विचारपूस करुन त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्हा कबूल केला असून त्याला १२ जूनच्या रात्री अटक करण्यात आली. त्याने आज १३ जून रोजी विचारपूस दरम्यान मालाबाबत माहिती दिल्याने सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी कापूस बियाणे, मका बियाणे, ज्वारीचे बियाणे व इतर बियाणे तसेच सदर गुन्ह्यात गुन्हा करतांना वापरण्यात आलेले छोटा हत्ती वाहन क्र.एम.एच.२८ अेबी.१०५४ असा एकूण २ लक्ष ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्यात ५ आरोपी निष्पन्न झालेली असून उर्वरीत आरोपीतांचा बोराखेडी पोलिस शोध घेत आहेत
Leave a Reply