Breaking newsHead linesMaharashtraPolitics

राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांचा नकार!

विरोधकांचा उमेदवार बनणार नाही – पवार
नवी दिल्ली/ नुपूर त्रिवेदी-झा
पुढील महिन्यात १८ जुलैरोजी होणार्‍या राष्ट्रपती निवडीसाठीच्या मोर्चेबांधणीला राजधानी नवी दिल्लीत जोरदार वेग आला आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) व काँग्रेस नेतृत्वातील विरोधी पक्षांकडून कोणत्याही नावावर एकमत झालेले नसताना, शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. तर, खुद्द शरद पवार यांनी आपण या पदाच्या शर्यतीत नाही, विरोधकांकडून या पदाचा उमेदवार आपण बनणार नसल्याचे पवार यांनीच स्पष्ट केले आहे.
राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरविण्यासाठी राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या सूचनेवर चर्चा झाली. त्यावर शरद पवार यांनी राष्ट्रपती निवडणूक लढविण्यास नकार देत, विरोधकांचा उमेदवार बनण्यास असमर्थता दर्शविली. सत्ताधारी एनडीएकडून हा प्रस्ताव आल्यास काय, यावर मात्र त्यांनी मौन बाळगणे पसंत केले असल्याचे सांगण्यात आले.

आप, काँग्रेसचा पवारांना पाठिंबा
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांना आम आदमी पक्ष व काँग्रेसचा पाठिंबा यापूर्वीच मिळेला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत विधान केलेले आहे. राष्ट्रपती निवडणूक १८ जुलै रोजी होणार असून, २१ जुलैला निवडणूक निकाल हाती येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!